Pahalgam Terror Attack: घरात तलवारी आणि चाकू ठेवा, आरएसएस नेत्याचं हिंदूंना आवाहन

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आरएसएस नेत्याचं हिंदूंना आवाहन, 'घरात तलवारी आणि चाकू ठेवा, 6 इंचाच्या चाकूसाठी...', सध्या सर्वत्र आरएसएस नेत्याच्या वक्तव्याची चर्चा

Pahalgam Terror Attack:  घरात तलवारी आणि चाकू ठेवा, आरएसएस नेत्याचं हिंदूंना आवाहन
| Updated on: Apr 30, 2025 | 12:10 PM

Pahalgam Terror Attack: जम्मू – काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे… असं मागणी भारतीयांना सरकारकडे केली आहे. दुर्दैवी गोष्ट म्हणजे पहलगाम याठिकाणी फिरायला गेलेल्या पर्यटकांना हिंदू आहे की मुस्लिम… मुस्लिम असल्यास कलमा बोलून दाखल… अशी धमकी देत दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात 26 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. दरम्यान, हिंदूंना लक्ष्य करून त्यांची हत्या केल्यानंतर, देशभरातील हिंदूंमध्ये त्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढताना दिसत आहे.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) ज्येष्ठ नेते के. प्रभाकर भट यांनी दहशतवादी हल्ल्याचा हवाला देत असं सुचवलं की ‘हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी घरी तलवारी आणि चाकू ठेवायला हव्यात. सध्या सर्वत्र प्रभाकर भट यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

सोमवारी केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील मंजेश्वर येथील वरकाडी येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रभाकर भट यांनी हिंदूंना घरात तलवारी आणि चाकू ठेववण्याचा सल्ला दिला आहे. ‘प्रत्येक हिंदूच्या घरात तलवार असली पाहिजे, जर पहलगाम हल्ल्यादरम्यान हिंदूंनी तलवार दाखवली असती तर ते पुरेसं असतं. त्यांनी महिलांना देखील नेहमीच्या वस्तूंसोबत त्यांच्या बॅगेत चाकू ठेवण्याचं आवाहन केलं आहे.’

‘सहा इंचाचा चाकू ठेवण्यासाठी कोणत्या ‘परवाना’ची आवश्यकता नाही…’ असं दावा करत प्रभाकर भट म्हणाले, ‘जर संध्याकाळी तुम्ही बाहेर असाल आणि हल्ला होण्याची शक्यता असेल तर, हल्लेखोराकडे विनंती करु नका. फक्त त्याला चाकू दाखवा की तो पळून जाईल…’ असं देखील प्रभाकर भट म्हणाले.

हिंदू-मुस्लिम संघर्षांवर काय म्हणाले प्रभाकर भट?

भूतकाळातील सांप्रदायिक तणावांचा उल्लेख करताना भट म्हणाले, “पूर्वी हिंदू-मुस्लिम संघर्षाच्या वेळी हिंदू पळून जायचे. आता हे चित्र बदलत आहे, आपण संघर्षासाठी सज्ज असलं पाहिजे आणि प्रत्येकाने तलवार घरी ठेवल्या पाहिजे.” असं देखील प्रभाकर भट म्हणाले.

प्रभाकर भट यांच्या या टिप्पणीवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. पण पोलिसांकडून अद्याप कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही. अनेक उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी भूतकाळात हिंदूंना शस्त्रे ठेवण्याचा सल्ला दिला आहे, परंतु हे विधान अशा वेळी देण्यात आलं आहे जेव्हा पहलगाम हल्ल्यानंतर भारतातील हिंदू संतप्त आहेत.