
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त बंगळुरू येथे दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 नोव्हेंबराला विविध मान्यवर उपस्थित असणार आहे. दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यानांमध्ये विविध विषयांवर प्रकाश टाकला जाणार आहे. या व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध मुद्यांवर प्रकाश टाकताना संघाची भूमिका, संघाचे कार्य, संघाची भविष्यातील योजना आणि इतर अनेक मुद्यांवर आपले मत व्यक्त केले.
आज पहिल्या दिवशी आपल्या व्याख्यानात मोहन भागवत म्हणाले की, संघ ही एक अद्वितीय संघटना आहे. संघाचा उद्देश कोणाचाही विरोध करणे नाही तर संपूर्ण समाजाला एकत्र करणे आहे. संघाने संपूर्ण समाजाचे संघटन करण्यासाठी आणि व्यक्तींचा विकास करण्यासाठी एक पद्धत विकसित केली आहे. संघ त्याच्या शाखांमधील प्रत्येक व्यक्तीला फक्त भारतमातेचा विचार करण्याचे प्रशिक्षण देतो. संघाचे एकच ध्येय आहे: “संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन.”
संघाची प्रार्थना “भारत माता की वंदना” ने सुरू होते आणि “भारत माता की जय” ने संपते. संघ सत्तेसाठी नाही तर भारतमातेच्या गौरवासाठी हिंदू समाजाचे संघटन करण्याचा प्रयत्न करतो. संघाच्या कार्यासाठी बाहेरून एकही पैसा घेतला जात नाही. जगात अशी कोणतीही स्वयंसेवी संघटना नाही जिने संघासारख्या अडचणींचा सामना केला असेल. संघाने तीन बंदी सहन केल्या, मात्र तिसरी बंदी खऱ्या अर्थाने महत्त्वाची नव्हती.
या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी खालील मान्यवर हजर असणार आहेत