AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSS च्या बंगळुरु येथील चिंतन शिबिरात बांगलादेशासंदर्भात ठराव पास, काय केली मागणी पाहा ?

आरएसएसचे तीन दिवसीय चिंतन शिबिर कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथे भरले आहे. या शिबिरात बांग्लादेशा संदर्भात ठराव पास झाला आहे.या ठरावात आरएसएसने बांग्लादेशातील हिंदू संदर्भात महत्वाची मागणी केली आहे.

RSS च्या बंगळुरु येथील चिंतन शिबिरात बांगलादेशासंदर्भात ठराव पास, काय केली मागणी पाहा ?
मोहन भागवत
| Updated on: Mar 22, 2025 | 5:05 PM
Share

राष्ट्रीय स्वयं संघाचे तीन दिवसीय शिबीर कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथे भरले आहे. या शिबिरात बांग्लादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आरएसएसने ठराव पास केला आहे. हिंदूंवर अन्याय होत असताना आपण याकडे केवळ राजकारण म्हणून दुर्लक्ष करणे किंवा कानाडोळा करणे म्हणजे सत्यापासून तोंड लपवणे आहे. कारण अधिकांश पीडित हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांक समुदायातील आहेत. या प्रकरणात आरएसएसच्या प्रतिनिधी सभेच्या बैठकीत युनायडेट नेशनने हस्तक्षेप करावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.

बंगळुरु येथील आरएसएसच्या शिबिरात बांग्लादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाबद्दल निषेधाचा ठराव मांडण्यात आला आहे. आपल्याला हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात उभे रहायला हवे असे या बैठकीत चिंतन झाले. सामाजिक जीवनात एखादी समस्या असेल तर त्यावर उपाय शोधावा लागतो. केवळ सरकारी पत्रक काढणे, सल्ला देणे हे आरएसएसच्या विचार करण्याची पद्धत नाही. संघाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. आम्ही समाजाच्या ताकदी आधारे समाजातील सर्व प्रश्नांवर उत्तर शोधत असतो. हे या बैठकीत उदाहरणाने समजविण्यात आले.

बांगलादेशातला हिंसाचार भारतविरोधी …

बांगलादेशातील हिंसाचार हा केवळ हिंदू विरोधातला नाही तर तो भारताच्या विरोधातला देखील आहे. अविश्वास आणि अविश्वासाचे वातावरण तयार केले जात आहे. बांग्लादेशात हिंदू आणि भारताविरोधात आंतरराष्ट्रीय शक्ती देखील सक्रीय आहेत. पाकिस्तान, डीप स्टेट आदी बांगलादेशात हिंदू समाज आणि भारताविरोधात काम करीत आहेत असे बैठकीत असे म्हटले गेले.

500 मुलांना मिळाले नवे जीवन

मध्य प्रदेशात एक असे गाव आहे तिथे लहान मुलांचे हात आणि पाय एकत्र जोडलेले आहेत, त्यामुळे ते सामान्य जीवन जगू शकत नाहीत. हे एक प्रकारचे अपंगत्व आहे. यावर आम्ही चर्चा केली आणि डॉक्टरांशी बोललो तेव्हा कळले की ऑपरेशन केले तर ही मुले सामान्य जीवन जगू शकतात. आम्ही गेल्या चार वर्षांत ५०० मुलांना समाजात सामान्य जीवन जगण्यासाठी ऑपरेशनची सुविधा उपलब्ध केली असे या बैठकीत सांगण्यात आहे.

तीन दिवस चालणार शिबिर

२१ मार्चपासून बंगळुरू येथे आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक सुरू झाली आहे. ही बैठक एकूण तीन दिवस चालणार आहे. काल संघप्रमुख मोहन भागवत यांनी या बैठकीचे उद्घाटन केले. संघाशी संलग्न ३२ संघटनांचे सुमारे १,४८० प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अत्याचारांची परिस्थिती आणि भविष्यातील उपाययोजनांवरील पहिला ठराव मंजूर करण्यात आला आहे. दुसरा ठराव संघाचा गेल्या १०० वर्षातील प्रवास, शताब्दी वर्षातील उपक्रम आणि भविष्यातील योजन यावर आधारित आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.