Russia Ukraine War : युक्रेन-रशिया पुन्हा वाटाघाटीच्या टेबलावर, युद्धावर तोडगा निघणार?

आज या दोन्ही देशात चर्चेची दुसरी फेरी सुरू आहे. यातून तरी मार्ग निघणार का? युद्धावर तोडगा निघणार का? असे अनेक सवाल जगाच्या मनात आहेत.

Russia Ukraine War : युक्रेन-रशिया पुन्हा वाटाघाटीच्या टेबलावर, युद्धावर तोडगा निघणार?
Image Credit source: twitter
| Updated on: Mar 03, 2022 | 9:05 PM

मुंबई : युक्रेन आणि रशिया (Russia Ukraine War) या दोन देशात गेल्या आठवडाभरापासून युद्ध सुरू आहे. युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशात दोन दिवसांपूर्वीच चर्चेची पहिली फेरी पार पडली मात्र ती निष्फळ ठरली होती. आज या दोन्ही देशात चर्चेची दुसरी फेरी सुरू आहे. यातून तरी मार्ग निघणार का? युद्धावर तोडगा निघणार का? असे अनेक सवाल जगाच्या मनात आहेत. चर्चेनंतरच युद्धाबाबत स्पष्टता येईल. मात्र आज पुन्हा हे दोन्ही देश वाटाघाटीच्या टेबलावर आले आहेत. सकाळीच युक्रेनने (Ukraine) चर्चेला नकार दिल्याची बातमी आली होती. बेलारूसमध्ये (Belarus) या दोन्ही देशात चर्चेची पाहिली फेरी पार पडली आहे. त्यानंतर चर्चेच्या दुसऱ्या फेरीबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र सध्याकाळपर्यंत या दोन्ही देशात चर्चा सुरू असल्याची बातमी आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

एएफपी वृत्तसंस्थेचे ट्विट

रशियाचा पाश्चमात्यांवर गंभीर आरोप

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी गुरुवारी पाश्चात्य देशांवर अणुयुद्धाचा विचार असल्याचा आरोप केला. लॅव्हरोव्ह यांनी रशियन आणि परदेशी माध्यमांना दिलेल्या ऑनलाइन मुलाखतीत सांगितले की, हे स्पष्ट आहे की तिसरे महायुद्ध केवळ अण्वस्त्र युद्ध असू शकते. मी हे निदर्शनास आणू इच्छितो की अणुयुद्धाची कल्पना रशियन लोकांच्या डोक्यात नसून पाश्चात्य देशांच्या नेत्यांच्या मनात सतत आहे.

रशियाच्या मोठ्या नुकसानीचा दावा

रशियाने हल्ले आणखी तीव्र केले

रशियाने युक्रेनवर हवाई हल्ले तीव्र केले आहेत. राजधानी कीवसह अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, कीवमध्ये एकाच वेळी भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. त्यामुळे रशियाने हल्ले आणखी तीव्र केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या युद्धाची दाहकता आणकी वाढली आहे. युद्ध थांबवण्याासाठी जगभरातून रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय. मात्र अजूनही युद्ध शांत व्हायचे नाव घेत नाही. आता या चर्चेतून तरी मार्ग निघेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ही चर्चा संपल्यानंतरच याबाबत स्पष्टता येईल.

Russia Ukraine War : मोदींनी साधला युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद, विद्यार्थ्यांनी सांगितला युद्धाचा थरार

Russia Ukraine War Video : युक्रेनमधील इरपिन शहर बेचिराख, काळजाचा थरकाप उडवणारा Video

Russia Ukraine War : अमेरिका, इग्लंड, जपानचा झेंडा रशियाने काढला, तिरंगा मात्र सही सलामत, रशियाच्या मनात नेमकं काय?