AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Ukraine War Video : युक्रेनमधील इरपिन शहर बेचिराख, काळजाचा थरकाप उडवणारा Video

हल्ल्यात युक्रेनमधील  (Russia Ukraine War) अनेक शहरांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक इमारती कोसळल्या आहेत. तर सगळीकडे बेचिराख युक्रेन दिसतंय. कालपासून रशियाने आपले लक्ष युक्रेनमधील इरपिन (Irpin) शहराकडे केंद्रीत केले होते.

Russia Ukraine War Video : युक्रेनमधील इरपिन शहर बेचिराख, काळजाचा थरकाप उडवणारा Video
इरपिन शहराची अवस्था बिकटImage Credit source: NEXTA
| Edited By: | Updated on: Mar 03, 2022 | 4:58 PM
Share

नवी दिल्ली : गेल्या आठ दिवसांपासून रशियाचे (Russia)  युक्रेनवर सतत जोरदार हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यात युक्रेनमधील  (Russia Ukraine War) अनेक शहरांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक इमारती कोसळल्या आहेत. तर सगळीकडे बेचिराख युक्रेन दिसतंय. कालपासून रशियाने आपले लक्ष युक्रेनमधील इरपिन (Irpin) शहराकडे केंद्रीत केले होते. रशियाने या शहरावर जोरदार मिसाईल हल्ले चढवल्या या शहरांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. बेचिराख झालेलं हे शहर तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता. तर रशियाचेही मोठे नुकसान झाल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात येत आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी गुरुवारी पाश्चात्य देशांवर अणुयुद्धाचा विचार असल्याचा आरोप केला. लॅव्हरोव्ह यांनी रशियन आणि परदेशी माध्यमांना दिलेल्या ऑनलाइन मुलाखतीत सांगितले की, हे स्पष्ट आहे की तिसरे महायुद्ध केवळ अण्वस्त्र युद्ध असू शकते. मी हे निदर्शनास आणू इच्छितो की अणुयुद्धाची कल्पना रशियन लोकांच्या डोक्यात नसून पाश्चात्य देशांच्या नेत्यांच्या मनात सतत आहे.

बेचिराक इरपिनचा व्हिडिओ

युक्रेनिय सैन्याचा दावा काय?

युक्रेनच्या लष्कराच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंतच्या युद्धात रशियाचे खूप नुकसान झाले आहे. रशियाने 9000 सैनिक गमावले आहेत. याशिवाय, 30 विमाने, 374 कार, 217 टँक आणि 900 आर्म्ड पर्सनल कॅरियर्स गमावले आहेत. याशिवाय त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनने रशियाशी वाटाघाटी करण्यास नकार दिला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात आज पुन्हा बेलारूस-पोलंड सीमेवर चर्चा होणार असल्याची बातमी यापूर्वी आली होती. मात्र ती शक्यताही आता धुसर झाली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियन सैन्याला माघार घेण्याचे आवाहन केले असून, गेल्या आठवड्यात सुमारे 9,000 रशियन मारले गेले आहेत. असा त्यांचा दावा आहे.

रशियाने हल्ले आणखी तीव्र केले

रशियाने युक्रेनवर हवाई हल्ले तीव्र केले आहेत. राजधानी कीवसह अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, कीवमध्ये एकाच वेळी भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. त्यामुळे रशियाने हल्ले आणखी तीव्र केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या युद्धाची दाहकता आणकी वाढली आहे. युद्ध थांबवण्याासाठी जगभरातून रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय. मात्र अजूनही युद्ध शांत व्हायचे नाव घेत नाही.

Russia Ukraine War : अमेरिका, इग्लंड, जपानचा झेंडा रशियाने काढला, तिरंगा मात्र सही सलामत, रशियाच्या मनात नेमकं काय?

Russia Ukrane War : रशियाशी चर्चेला युक्रेनचा नकार, युद्धाची धग आणखी वाढणार

उद्ध्वस्त घरं, भुताटकी रस्ते, आकाशात शत्रूच्या घिरट्या, चिमुकल्यांचा टाहो, बेचिराख यूक्रेनचे फोटो पाहिलात?

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.