या महिलेवर आपला जीव ओवाळून टाकतात पुतिन, रशियाच्या राष्ट्रपतींवर जबरदस्त कंट्रोल, रशिया, युक्रेन युद्धही थांबवू शकते
व्दादीमीर पुतिन हे आपल्या रोख ठोक स्वभावासाठी ओळखले जातात. ते अत्यंत शिस्तप्रिय आणि कठोर आहेत, मात्र तरी देखील ते एका महिलेवर आपला जीव ओवाळून टाकतात. तिचा आदेश हा पुतिन यांच्यासाठी अंतिम असतो.

सध्या जगभरात फक्त दोनच व्यक्तींची जोरदार चर्चा सुरू आहे, एक म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि दुसरे व्यक्ती रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन. रशियाचे राष्ट्रपती पुतिन हे आपल्या रोख-ठोक भूमिकांसाठी जगभरात ओळखले जातात. अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्र देखील रशियाला घाबरून असतात, पुतिन हे अतिशय शिस्तप्रिय तसेच आक्रमक स्वभावाचे आहेत. मात्र त्यांची एक सॉफ्ट साइड देखील आहे, जीने संपूर्ण जगाला कोड्यात टाकले. एकाच व्यक्तीमध्ये दोन कमालीच्या टोकाच्या विरूद्ध भूमिका पहायला मिळाल्या, हे तेव्हा घडलं जेव्हा व्लादीमीर पुतिन हे त्यांच्या बालपणीच्या शिक्षिका वेरा दिमित्रीवना गुरेविच यांना भेटले. पुतिन आणि त्यांच्या शिक्षिकेची भेट होताच पुतिन यांनी त्यांची गळा भेट घेतली. आपल्या बालपणीच्या शिक्षिकेची भेट होताच पुतिन यांच्या चेहर्यावर एक समाधानाचं हास्य दिसून आलं, जे की यापूर्वी फारच कमी वेळेला पहायला मिळतं. मिडिया रिपोर्टनुसार वेरा दिमित्रीवना गुरेविच या एकमात्र अशा महिला आहेत, ज्यांचा पुतिन प्रचंड आदर करतात, त्यांनी जर मनात आणलं तर त्या रशिया आणि युक्रन युद्ध देखील थांबवू शकतात.
कोण आहेत वेरा दिमित्रीवना?
वेरा दिमित्रीवना गुरेविच या व्लादीमीर पुतीन यांच्या बालपणीच्या शिक्षिका आहेत, ज्यांनी पुतिन यांचं अवघं आयुष्यच बदलून टाकलं. पुतिन रशियाचे राष्ट्रपती बनले त्याचं श्रेय देखील ते आपल्या याच शिक्षिकेला देतात. वेरा दिमित्रीवना यांनी लिहिलेल्या आपल्या आत्मकथेत त्या म्हणतात की बालपणी पुतिन हे खूप बंडखोर होते. ते वर्गामध्ये प्रचंड मस्ती करायचे. नेहमी दुसऱ्याच्या भांडणांमध्ये पडायचे. जे दोषी आहेत त्यांना शिक्षा देखील द्यायचे. पुतिन यांच्या अशा स्वभावामुळे अनेक जण त्यांच्याशी बोलणं टाळू लागले. त्यांचे आई वडील देखील यामुळे चिंतेत होते. पण त्यावेळी मला जाणवलं की पुतिन यांना मोटिवेशनची गरज आहे, जे की मी त्यांना देण्याचा प्रयत्न केला, आणि त्यानंतर पुतिन यांच्यामध्ये मोठा बदल पहयाला मिळाला.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार पुतिन हे त्यांच्या या शिक्षिकेचा प्रचंड आदर करतात. ते आपल्या या शिक्षिकेचा एवढा आदर करतात की जर त्यांनी पुतिन यांच्याकडे रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्याची मागणी केली तर पुतिन युक्रेनविरोधातील युद्ध देखील थांबवू शकतात. त्यांचा आदेश पुतिन यांच्यासाठी अंतिम आहे. आज देखील आपण ज्या पदावर आहोत, ते केवळ आपल्या या शिक्षिकेमुळेच आहोत, असंही पुतिन मान्य करतात.
