रशियाचं भारताला मोठं गिफ्ट, पुतिन यांची सर्वात मोठी घोषणा, अमेरिकेचं टेन्शन वाढलं, पाकिस्तानची झोप उडाली

मोठी बातमी समोर येत आहे, रशियाकडून आता भारताला आणखी एक मोठ गिफ्ट देण्याची तयारी सुरू आहे. यामुळे अमेरिकेचं आणि पाकिस्तानचं टेन्शन चांगलंच वाढण्याची शक्यता आहे.

रशियाचं भारताला मोठं गिफ्ट, पुतिन यांची सर्वात मोठी घोषणा, अमेरिकेचं टेन्शन वाढलं, पाकिस्तानची झोप उडाली
रशियाची मोठी घोषणा
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 31, 2025 | 6:28 PM

अमेरिकेच्या टॅरिफनंतर भारत आणि रशियाची जवळीक वाढत आहे, काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे भारताच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी भारत आणि रशियामध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले. भारताला कच्च्या तेलाची कधीही कमी पडू देणार नाही अशी मोठी घोषणा त्यावेळी पुतिन यांनी केली होती. हा अमेरिकेसाठी मोठा झटका मानण्यात आला होता. कारण भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे रशिया आता भारताला आणखी एक मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये आहे. भारताच्या हवाई संरक्षणाला अधिक मजबूत करण्यासाठी आता रशियाने भारताला S-350 वित्याज हवाई संरक्षण प्रणाली देण्याची तयारी दर्शवली आहे. रशिया भारताला केवळ S-350 वित्याज हवाई संरक्षण प्रणालीच उपलब्ध करून देणार नाही तर तिचं तंत्रज्ञान देखील हस्तांतरीत करणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार रशिया भारताला S-350 वित्याज हवाई संरक्षण प्रणाली उपलब्ध करून देणार आहे. हे एक अत्याधुनिक मध्यम पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली आहे, रशिया या हवाई संरक्षण प्रणालीचं तंत्रज्ञान देखील भारताला देणार आहे, कारण त्यामुळे या संरक्षण प्रणालीचे काही भाग हे भारतात बनवणे शक्य होणार आहे. रशियाकडून मिळणारी S-350 वित्याज हवाई संरक्षण प्रणाली भारत सध्या जी हवाई संरक्षण प्रमाणी वापरत आहे, तिच्यासोबत मिळून भारताच्या हवाई संरक्षणाला अधिक मजबूत करणार आहे.

दरम्यान यामुळे आता अमेरिकेचं आणि पाकिस्तानचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. रशिया आणि भारतामध्ये वाढत असलेली जवळीक हा कायमच अमेरिकेसाठी डोकेदुखीचा विषय राहिला आहे. रशिया आणि भारतामध्ये जवळीक वाढू नये, असं अमेरिकेला वाटतं, मात्र अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफनंतर रशिया आणि भारताची जवळीक आता आणखी वाढली असून, रशियाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. रशियाकडून भारताला हवाई संरक्षण प्रणाली मिळणार आहे. पुतिन यांच्या दौऱ्यानंतर ही मोठी घोषणा करण्यात आली आहे.