Rajasthan Updates: ‘टीम पायलट’च्या ठिकाणाचं गूढ वाढलं, बंडखोर आमदार कर्नाटकमध्येही नाही

राजस्थानमधील सचिन पायलट समर्थक बंडखोर आमदार नेमके कोठे आहेत याविषयीचं गूढ वाढलं आहे (Sachin Pilot supporter rebel MLA of missing).

Rajasthan Updates: ‘टीम पायलट’च्या ठिकाणाचं गूढ वाढलं, बंडखोर आमदार कर्नाटकमध्येही नाही
Follow us
| Updated on: Jul 19, 2020 | 8:42 AM

नवी दिल्ली : राजस्थानमधील बंडखोर आमदार नेमके कोठे आहेत याविषयीचं गूढ वाढलं आहे (Sachin Pilot supporter rebel MLA of missing). त्यांच्या मुक्कामाचा पत्ता शोधण्यासाठी राजस्थानचं विशेष पथक जोरदार प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप या आमदारांच्या ठिकाणाची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याआधी आमदार कर्नाटकमध्ये असल्याची चर्चा होती, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका बंडखोर आमदाराने आपण भाजपशासित कर्नाटकमध्ये नसल्याचं स्पष्ट केलं आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत बंडखोर आमदार कर्नाटक असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन पायलट यांच्या समर्थक बंडखोर आमदारांपैकी एकाने आपण मध्य प्रदेशच्या आमदारांप्रमाणे कर्नाटकमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच आत्ताच आम्ही आमचं ठिकाण सांगू शकत नाही असंही म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेसने सचिन पायलट यांच्यावर कारवाई केली असली तरी अद्याप राजस्थानमधील राजकीय संकट टळलेलं नसल्याचंच दिसत आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

शुक्रवारपासून बंडखोर आमदार बेपत्ता

शुक्रवार (17 जुलै) सायंकाळपासून सचिन पायलट आणि त्यांचे 18 आमदार बेपत्ता आहेत. राजस्थानचं विशेष तपास पथक त्यांचा शोध घेत आहे. हे पथक आमदारांचा शोध घेत भाजपशासित हरियाणामध्ये देखील गेलं होतं. मात्र, तेथूनही पथकाला रिकामे हात घेऊन परतावं लागलं. या पथकाला हरियाणात एकही आमदार सापडला नाही. हे पथक राजस्थान सरकार पाडण्याच्या कटाप्रकरणी एका ऑडिओ टेपचा तपास करत आहेत. या प्रकरणी आमदार भंवर लाल शर्मा यांच्या आवाजाचा नमुना घेण्यासाठी हे पथक हरियाणात केलं होतं.

बंडखोर आमदार दिल्लीच्या आजूबाजूला असल्याचा संशय

राजस्थानचं विशेष पथक हरियाणातील मानेसर हॉटलमध्ये गेलं तेव्हा सुरुवातीला त्यांना हरियाणा पोलिसांनी काही वेळ अडवलं, नंतर जाऊ दिलं. त्या ठिकाणी त्यांना एकही आमदार आढळला नाही. राजस्थान विशेष पथकातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंडखोर आमदार दिल्लीत लपल्याची शक्यता आहे. राजस्थानचं राजकारण देखील मध्य प्रदेशच्या राजकारणाप्रमाणे सुरु आहे. याआधी ज्योदिरादित्य शिंदे यांनी आपल्या 22 निष्ठावान आमदारांसह बंड करत काँग्रेसला रामराम ठोकला. त्यामुळे मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार कोसळलं आणि पुन्हा एकदा भाजपने सत्ता स्थापन केली.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

काँग्रेसने सचिन पायलट यांच्यावर केलेल्या कारवाईविरोधात पायलट यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी मंगळवारी (21 जुलै) सुनावणी आहे. त्यामुळे तोपर्यंत सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार गुप्त ठिकाणी थांबल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा :

संकोच नको, खट्टरांचं सुरक्षाचक्र भेदून घरी परत या, सचिन पायलट यांना काँग्रेसची साद

काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप, सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ 300 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Rajasthan Political Crisis : अशोक गहलोत जास्त दिवस मुख्यमंत्री राहणार नाहीत, भाजपची प्रतिक्रिया

Sachin Pilot supporter rebel MLA of missing

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.