Rajasthan Political Crisis : अशोक गहलोत जास्त दिवस मुख्यमंत्री राहणार नाहीत, भाजपची प्रतिक्रिया

अशोक गहलोत जास्त दिवस मुख्यमंत्रिपदावर राहणार नाहीत, असा सूचक इशारा भाजपने दिला आहे (BJP reaction on expulsion of Sachin Pilot).

Rajasthan Political Crisis : अशोक गहलोत जास्त दिवस मुख्यमंत्री राहणार नाहीत, भाजपची प्रतिक्रिया

जयपूर : राजस्थानमधील राजकीय संघर्षानंतर काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने बंडखोर सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली. यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया आली आहे. भाजपचे नेते शाहनवाज हुसेन यांनी काँग्रेसवर सचिन पायलट यांचा अपमान केल्याचा आरोप केला. तसेच अशोक गहलोत जास्त दिवस मुख्यमंत्रिपदावर राहणार नाहीत, असा सूचक इशाराही दिला (BJP reaction on expulsion of Sachin Pilot). त्यामुळे येणाऱ्या काळात राजस्थानमध्ये कोणत्या राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शाहनवाज हुसेन म्हणाले, “काँग्रेसने सचिन पायलट यांचा अपमान केलाय. एक षडयंत्र आखून त्यांना उपमुख्यमंत्रिपदावरुन हटवण्यात आलं आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसकडे बहुमत नाही. आता अशोक गहलोत जास्त दिवस मुख्यमंत्री राहणार नाहीत.”

“हे भांडण अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील नाही. तर ही लढाई राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासमोर दुसरं प्रतिभावान नेतृत्व उभं राहू नये यासाठी आहे. राजस्थानमधील निवडणुकीत मेहनत सचिन पायलट यांनी केली, मात्र मुख्यमंत्रिपद अशोक गहलोत यांना देण्यात आलं. सचिन पायलट यांचा वारंवार अपमान करण्यात आला,” असं मत शाहनवाज यांनी व्यक्त केलं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

भाजपकडून याआधीच सचिन पायलट यांना भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यांचं पक्षात स्वागत आहे, असं सांगण्यात आलं आहे. भाजपनेही आज बैठक घेत राजस्थानमधील स्थितीविषयी चर्चा केली आणि आपली रणनीती तयार केली. असं असलं तरी भाजपकडून अजूनही बहुमत चाचणीची मागणी झालेली नाही. सध्या परिस्थितीवर लक्ष असल्याचंच भाजपकडून सांगण्यात येत आहे.

सचिन पायलट यांची प्रतिक्रिया

“सत्याला तुम्ही व्यथित करु शकता, पराभूत करु शकत नाही” (सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं) असे ट्वीट सचिन पायलट यांनी केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष’ ही माहितीही हटवली.

दरम्यान, सुरजेवाला म्हणाले, “सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि विश्वेंदर सिंह आणि रमेश मिना यांना मंत्रिपदावरुन तात्काळ काढलं जात आहे. राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदावर राजस्थानचे शिक्षण मंत्री गोविंदसिंह यांची नियुक्ती करण्यात येते. ते शेतकरी पुत्र असून त्यांनी शेतीच्या मशागतीसोबतच काँग्रेसची देखील मशागत केली. ते जिल्हाध्यक्ष पदावरुन इथपर्यंत आले आहेत.”

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“आदिवासी सहकारी आमदार गणेश गोगरा यांना राजस्थानच्या यवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात येत आहे. हेमसिंह शेखावत यांना राजस्थान प्रदेश सेवा दलाच्या अध्यक्षपदी निवडण्यात आलंआहे,” असंही सुरजेवाला यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काँग्रेसचं सरकार व्यक्तीवर अवलंबून नाही, तर मुल्यांवर टिकलेलं असल्याचं सांगत हे सरकार 5 वर्षे टिकेल असंही सांगितलं.

हेही वाचा : 

Sachin Pilot | राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरुन हकालपट्टी, सचिन पायलट यांची 9 शब्दात प्रतिक्रिया

Govind Singh Dotasra | काँग्रेसचा आक्रमक नेता राजस्थानच्या प्रदेशाध्यक्षपदी, गोविंदसिंग यांच्याकडे नेतृत्व

Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रीपदावरुन हकालपट्टी

BJP reaction on expulsion of Sachin Pilot

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *