Rajasthan Political Crisis Live Updates: सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रीपदावरुन हकालपट्टी

Rajasthan Political Crisis Live Updates: सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रीपदावरुन हकालपट्टी

राजस्थानमध्ये काँग्रेसमधील नाराजीनाट्य सुरुच आहे. सचिन पायलट यांच्या बंडखोरीने राजकीय संकट निर्माण झालं आहे (Rajasthan Political Crisis Congress).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jul 14, 2020 | 2:18 PM

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये काँग्रेसमधील नाराजीनाट्य आणि राजकीय संकट सुरुच आहे. बंडखोरी करत दिल्लीत आलेल्या सचिन पायलट यांची अखेर काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर मंत्र्यांचीही हकालपट्टी करण्यात आली. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाची घोषणा केली. तसेच काँग्रसेच्या पक्षांतर्गत नव्या नियुक्त्यांचीही माहिती दिली.

LIVE Updates:

  • काँग्रेसकडून सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी, त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर मंत्र्यांचीही मंत्रिमंडळातून हकालपट्टी
  • सचिन पायलट यांच्याशी अनेकवेळा संवाद साधला, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या आदेशाने पायलट यांच्यासाठी सर्व दरवाजे खुले असल्याचं सांगितलं, अंतर्गत वाद पक्षात मिटवण्याचं आश्वासन दिलं- रणदीप सुरजेवाला

  • राजस्थानात बहुमताचं सरकार, मात्र साम-दाम-दंड भेद वापरुन भाजपचं घाणेरडं राजकारण सुरुय, हे राजस्थानातील 8 कोटी जनतेच्या स्वाभिमानाला आव्हान आहे – रणदीप सुरजेवाला
  • भाजपकडून सचिन पायलट यांना ऑफर, ओम माथूर यांच्याकडून पायलट यांचं स्वागत, भाजपकडून वेट अँड वॉच रणनीती

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

सुरजेवाला म्हणाले, “सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि विश्वेंदर सिंह आणि रमेश मिना यांना मंत्रिपदावरुन तात्काळ काढलं जात आहे. राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदावर राजस्थानचे शिक्षण मंत्री गोविंदसिंह यांची नियुक्ती करण्यात येते. ते शेतकरी पुत्र असून त्यांनी शेतीच्या मशागतीसोबतच काँग्रेसची देखील मशागत केली. ते जिल्हाध्यक्ष पदावरुन इथपर्यंत आले आहेत.”

“आदिवासी सहकारी आमदार गणेश गोगरा यांना राजस्थानच्या यवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात येत आहे. हेमसिंह शेखावत यांना राजस्थान प्रदेश सेवा दलाच्या अध्यक्षपदी निवडण्यात आलंआहे,” असंही सुरजेवाला यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काँग्रेसचं सरकार व्यक्तीवर अवलंबून नाही, तर मुल्यांवर टिकलेलं असल्याचं सांगत हे सरकार 5 वर्षे टिकेल असंही सांगितलं.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

व्हिप काढूनही सचिन पायलट आणि त्यांच्या गटातील आमदार गैरहजर राहिल्याने काँग्रेसकडून या सर्वांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यापूर्वी सचिन पायलट यांच्याशी काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली. मात्र, सचिन पायलट आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. काँग्रेसने आमदारांनी बैठकीला उपस्थित राहावं यासाठी कारवाईचा इशाराही दिला. मात्र, त्याने कोणताही फरक पडला नाही. त्यामुळे काँग्रेस पुढील चर्चेचा मार्ग बंद होताना दिसत आहे.

काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत राजस्थानमधील नेतृत्व बदलण्यावर कोणतीही चर्चा होणार नाही. तसेच सर्व आमदार अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देतील, असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं. हा सचिन पायलट यांच्या गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सचिन पायलट यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. सुरजेवाला यांनी पायलट यांना त्यांचं म्हणणं पक्षाच्या मंचावर मांडण्यास सांगितलं. त्यांनी अगदी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचाही हवाला देत सर्वजण त्यांचं म्हणणं समजून घेण्यास तयार असल्याचं सांगितलं. मात्र, यानंतरही सचिन पायलट तयार झाले नाही.

हेही वाचा :

बोटीतून उडी मारणाऱ्या उंदराप्रमाणे पायलट यांनी कलंकित होऊ नये : सामना

राजस्थानमधील बंडखोर आमदारांच्या बैठकीचा व्हिडीओ व्हायरल, सचिन पायलटांना किती आमदारांचा पाठिंबा?

Rajasthan Crisis: मुख्यमंत्री गहलोत समर्थकांवर आयकर छापे, दिल्ली ते राजस्थानपर्यंत धाडी

Rajasthan Political Crisis Congress

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें