AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजस्थानमधील बंडखोर आमदारांच्या बैठकीचा व्हिडीओ व्हायरल, सचिन पायलटांना किती आमदारांचा पाठिंबा?

सचिन पायलट यांचा आमदारांचा गट सध्या हरियाणातील एका रिसॉर्टवर थांबलेला आहे. या गटाने एक व्हिडीओ शेअर केला आहे (Video of Supporter MLA of Sachin Pilot).

राजस्थानमधील बंडखोर आमदारांच्या बैठकीचा व्हिडीओ व्हायरल, सचिन पायलटांना किती आमदारांचा पाठिंबा?
| Updated on: Jul 14, 2020 | 9:18 AM
Share

नवी दिल्ली : राजस्थानमधील राजकीय संकट अजूनही कायम आहे. सोमवारी (13 जुलै) काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची समजूत काढण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. मात्र, अद्याप त्यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश आलेले नाही. सचिन पायलट यांच्यासोबतचा आमदारांचा गट सध्या हरियाणातील एका रिसॉर्टवर थांबलेला आहे. या गटाने एक व्हिडीओ शेअर केला आहे (Video of Supporter MLA of Sachin Pilot). यात जवळपास 16 आमदार सोबत बसलेले दिसत आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आमदारांच्या बैठकीत 122 पैकी 106 आमदार हजर असल्याचा दावा केल्यानंतर हा व्हिडीओ समोर आला आहे.

पायलट गटाने हा 10 सेकंदाचा व्हिडीओ सचिन पायलट यांच्या ऑफिशिअल व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जवळपास 16 आमदार सोबत बसलेले दिसत आहेत. मात्र, स्वतः सचिन पायलट या व्हिडीओत दिसले नाही. या व्हिडीओमध्ये अन्य 6 व्यक्तीही आहेत, मात्र ते कोण आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

व्हिडीओमध्ये आमदार इंद्रराज गुर्जर, मुकेश भाकर, हरीश मीणा दिसत आहेत. हा व्हिडीओ ट्विट करत पर्यटन मंत्री विश्वेंद्र सिंह यांनी ‘फॅमिली’ असं म्हटलं. आमदार मुकेश भाकर यांनी अधिक आक्रमक होत काँग्रेसशी निष्ठा असण्याचा अर्थ अशोक गहलोत यांच्या पाया पडणं असा आहे. आम्हाला हे मान्य नाही. दरम्यान, सचिन पायलट यांनी आपल्याला 30 काँग्रेस आमदारांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. तसेच काही अपक्ष आमदारही सोबत असल्याचा दावा केला आहे. पायलट यांच्या गटाने मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या बहुमत असल्याच्या दाव्याला फेटाळलं आहे. तसेच सरकारकडे बहुमत असेल तर ते त्यांनी सभागृहात सिद्ध करावं, मुख्यमंत्री निवासावर नाही, असं म्हटलं आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाराज सचिन पायलट लवकरच भाजपमध्ये सहभागी होऊ शकतात. राजस्थानच्या 200 सदस्यीय विधानसभेत काँग्रेसकडे 107 आमदार आहेत. भाजपकडे 72 आमदार आहेत. काँग्रेसने 13 अपक्ष आणि दोन सीपीएम, भारतीय ट्रायबल पार्टीचे दोन आणि राष्ट्रीय लोक दलाच्या एका आमदाराचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा :

KP Oli | “खरी अयोध्या नेपाळमध्ये, प्रभू रामचंद्र भारतीय नव्हे, नेपाळी!” नेपाळच्या पंतप्रधानांचा जावईशोध

विशाखापट्टनममधील केमिकल कंपनीत भीषण आग, अनेकजण जखमी

Video of Supporter MLA of Sachin Pilot

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.