AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govind Singh Dotasra | काँग्रेसचा आक्रमक नेता राजस्थानच्या प्रदेशाध्यक्षपदी, गोविंदसिंग यांच्याकडे नेतृत्व

गोविंदसिंग डोटासरा हे सलग तिसऱ्यांदा विधानसभेत आमदारपदी निवडून आले आहेत. 2008 पासून ते राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

Govind Singh Dotasra | काँग्रेसचा आक्रमक नेता राजस्थानच्या प्रदेशाध्यक्षपदी, गोविंदसिंग यांच्याकडे नेतृत्व
| Updated on: Jul 14, 2020 | 2:44 PM
Share

जयपूर : बंडखोरीच्या वाटेवर असलेले युवा नेते सचिन पायलट यांची अखेर काँग्रेसने राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली. त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर मंत्र्यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. राजस्थानच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ गोविंदसिंग डोटासरा यांच्या गळ्यात घालण्यात आली आहे. (Rajasthan Congress President Govind Singh Dotasra)

गोविंदसिंग डोटासरा हे सध्या राजस्थानचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आहेत. ते राजस्थान सरकारमध्ये पर्यटन आणि देवस्थान मंत्रालयाची जबाबदारीही सांभाळतात.

कोण आहेत गोविंदसिंग डोटासरा?

गोविंदसिंग डोटासरा हे सलग तिसऱ्यांदा विधानसभेत आमदारपदी निवडून आले आहेत. 2008 पासून ते राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. डोटासरा हे 1981 पासून ते कॉंग्रेसमध्ये असून 2014 पासून राजस्थान प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत.

कॉंग्रेस नेतृत्वाने डोटासरा यांना राजस्थानच्या निवडणुकीपूर्वी ऑक्टोबर 2018 मध्ये मीडिया आणि कम्युनिकेशन समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करुन मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रीपदावरुन हकालपट्टी

डोटासरा यांनी 2005 मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि पंचायत निवडणुका यशस्वीरित्या लढल्या. त्यावेळी लक्ष्मणगड पंचायत समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. (Rajasthan Congress President Govind Singh Dotasra)

2008 मध्ये त्यांनी राजस्थान विधानसभेची निवडणूक प्रथमच लढवली आणि लक्ष्मणगडच्या जागेवर अपक्ष उमेदवार दिनेश जोशी यांच्याविरुद्ध अवघ्या 34 मतांनी विजय मिळवला होता.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

2013 मध्ये डोटासरा यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीत माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि 3 वेळा खासदार सुभाष महारिया यांना 10 हजार 723 च्या मताधिक्याने पराभूत केले.

डोटासरा विधानसभेच्या सर्व सत्रांमध्ये सक्रियपणे भाग घेतात. त्यांनी सदनात विशेषत: शेतकरी आणि समाजातील दुर्बल घटकांशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचे वक्तृत्व कौशल्य, आक्रमक भूमिकेमुळे पक्षाला मोठा फायदा झाला आहे.

(Rajasthan Congress President Govind Singh Dotasra)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.