loudspeaker Issue : साध्वी ऋतंभरा म्हणाल्या, अजान किंवा प्रार्थनेसाठी लाऊडस्पीकरची काय गरज?

| Updated on: Apr 30, 2022 | 6:07 PM

साध्वी ऋतंभरा म्हणाल्या की, प्रार्थनेसाठी शब्दांचीही गरज नसते, देव आतल्या भावना ऐकतो. तर जे 'प्रकृतीच्या विरोधात जे काही आहे त्याविरोधात घटनात्मकदृष्ट्या पावले चलली पाहिजेत.

loudspeaker Issue : साध्वी ऋतंभरा म्हणाल्या, अजान किंवा प्रार्थनेसाठी लाऊडस्पीकरची काय गरज?
साध्वी ऋतंभरा
Image Credit source: tv9
Follow us on

मंदसौर (मध्य प्रदेशा) : सध्या देशात मशीद, लाऊडस्पीकर (Loudspeaker) आणि हनुमान चालीसावरून मोठे राजकारण सुरू आहे. देशात यावरून राजकीय टोले बाजी सुरू आहे. तर महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी राज्य सरकारलाच भोंग्यावरून डेडलाईनच दिलं आहे. त्यावरून महाराष्ट्रातर सध्या बैठका लागल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सुरू झालेला लाऊडस्पीकरचा वाद देशात पोहचला आहे. त्यानंतर या वादावर अनेक नेत्यांनी आणि मुस्लिम संघटनांनी विरोध दर्शवला आहे. त्यानंतर काही भाजप नेत्यांनी ही वादग्रस्त वक्तव्यही केली आहेत. ज्यामुळे लाऊडस्पीकरवरचा वाद चिघळला आहे. आता याचवरून मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये साध्वी ऋतंभरा (Sadhvi Ritambhara) यांनी लाऊडस्पीकरवरून वादग्रस्त विधान केले आहे. तर अजान (Azaan) किंवा प्रार्थनेसाठी लाऊडस्पीकरची काय गरज? असं म्हटलं आहे. त्याआपल्या खाजगी दौऱ्यासाठी मंदसौरला पोहोचल्या होत्या. त्यावेळी पशुपतीनाथ मंदिराबाहेर पत्रकारांशी बोलताना साध्वी ऋतंभरा म्हणाल्या की, प्रार्थनेसाठी शब्दांचीही गरज नसते, देव आतल्या भावना ऐकतो. तर जे ‘प्रकृतीच्या विरोधात जे काही आहे त्याविरोधात घटनात्मकदृष्ट्या पावले चलली पाहिजेत. ध्वनी हा देखील एक प्रकारचा प्रदूषण आहे. आपल्या ठिकाणी अगदी सुरुवातीपासूनच म्हटलं जातं की मुंगीचा पाय जरी पडला तरी साहेब ऐकतात.

लाऊड स्पीकरवरून राजकारण तापले

लाऊडस्पीकरवर राजकारण आणि सरकारची कारवाई सातत्याने सुरू आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे. यूपीबद्दल बोलायचे झाले तर योगी सरकार राज्यातील धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवत आहे किंवा त्यांचा आवाज नियंत्रित केला जात आहे. 29 एप्रिलपर्यंत राज्यभरातून 37,002 लाऊडस्पीकर काढण्यात आले आहेत. तर 54,593 लाऊडस्पीकरचा आवाज नियंत्रित करण्यात आला. यूपीचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांच्या मते, ही मोहीम संपूर्ण राज्यात कोणताही भेदभाव न करता चालवली जात आहे. काढलेले लाऊडस्पीकर परवानगीशिवाय वाजवले जात होते. त्याचबरोबर धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्याबाबत गृह विभागाने ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यांकडून अहवाल मागवला आहे.

महाराष्ट्रातही लाऊडस्पीकर चर्चेत

उत्तर प्रदेशपासून महाराष्ट्रात लाऊडस्पीकरवरून वाद सुरू झाला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मशिदीतील लाऊडस्पीकर हटवण्यास विरोध केला आहे. मशिदीतील लाऊडस्पीकर काढून नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होता कामा नये, असे ते म्हणाले. जर कोणी मशिदीतून लाऊडस्पीकर काढायला आला तर त्यांचा पक्ष मशिदीचे संरक्षण करेल असेही त्यांनी म्हटलं होतं.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे यांचे वक्तव्यही

नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींमधून ३ मे पर्यंत लाऊडस्पीकर हटवावेत, असा अल्टिमेटम दिला आहे. मशिदींमधून लाऊडस्पीकर न हटवल्यास मनसे कार्यकर्ते राज्यभरातील मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठण करतील. धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवण्याच्या निर्णयाबद्दल त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले होते. तर राज ठाकरे उद्या, रविवारी औरंगाबादेत सभा घेणार आहेत. राज ठाकरेंचा लाऊडस्पीकरला विरोध सुरूच आहे. त्यासाठी ते औरंगाबादला जात आहेत. औरंगाबादहून निघण्यापूर्वी त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले.