उत्तर प्रदेश निवडणूक: EVM मध्ये छेडछाड केल्याचा अखिलेश यादवांचा आरोप; एक्झिट पोलवर गंभीर सवाल

| Updated on: Mar 08, 2022 | 8:36 PM

बनारसच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांबद्दल अखिलेश यादवांना गंभीर आरोप केले आहेत. बनारसचे जिल्हा दंडाधिकारी ईव्हीएम मशिन्सबाबत फेरफार करत आहेत असा आरोप करुन ते प्रशासनाशी बेईमानी करत असल्याचा आरोप केला आहे.

उत्तर प्रदेश निवडणूक: EVM मध्ये छेडछाड केल्याचा अखिलेश यादवांचा आरोप; एक्झिट पोलवर गंभीर सवाल
Akhjilesh Yadav
Image Credit source: Twitter
Follow us on

लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी 10 मार्च रोजी जाहीर होणाऱ्या निकालापूर्वीच गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अखिलेश यादव यांनी बनारसमध्ये ईव्हीएम मशिन्समध्ये छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे रोजी यूपी निवडणुकीच्या (UP Election) निकालापूर्वी गंभीर आरोप केले आहेत. शेवटच्या टप्प्यात सपा अध्यक्षांनी बनारसमध्ये ईव्हीएममध्ये (EVM) छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. याबद्दल अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘मुख्य सचिवांऐवजी ते डीएमला फोन करुन मतमोजणी कमी करण्यास सांगत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

गेल्या निवडणुकीत बनारसमध्ये भाजपला 47 जागाही जिंकता आल्या नव्हत्या. आणि यावेळी बनारसमध्येच सुरक्षिततेशिवाय ईव्हीएम काढताना एक वाहन पकडण्यात आले आहे. हे वाहन पकडताना त्यातील दोघे जण पळून गेल्याचेही त्यांनी सांगितले आहे. संबंधित जागेवरुन तुम्हाला ईव्हीएन हटवायची असतील तर तेथील उमेदवारांना सांगून तुम्ही त्या मशिन्स हलवल्या पाहिजे असे ही त्यांनी सांगितले.

एक्झिट पोलविषयीही गंभीर आरोप

एक्झिट पोलविषयीही त्यांना गंभीर आरोप केले आहेत. जे कोणी एक्झिट पोलविषयी ठामपणे सांगत आहेत, ते मतदाना आधीच भाजप जिंकणार असल्याचा समज मतदारांमध्ये पसरवत आहेत. त्यामुळे ही लोकशाहीतील ही अंतिम लढाई आहे असेही ते म्हणाले. त्यामुळे यानंतरच्या काळात नवी क्रांतीच करावी लागणार आहे. त्यामुळे मी सगळ्या पत्रकार, पक्षातील सदस्यांना आणि मतदारांना सांगणार आहे की, लोकशाही वाचवण्याची गरज आहे.

लोकशाहीसाठी हा काळ घातक

निवडणूकीत असे प्रकार होत असतील तर लोकशाहीसाठी हा काळ प्रचंड घातक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना आता निवडणुकीचे निकाल जाहीर होईपर्यंत या सगळ्यावर बारीक लक्ष ठेऊन थांबण्याचे आवाहनही त्यांना केले आहे. बरेलीमध्ये नगरपालिकेच्या गाडीतून तीन मशिन्स पकडण्यात आले आहेत आणि आता निवडणूक अधिकारी छापामारी टाकल्याचे नाटक करत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

अधिकाऱ्यांवरच गंभीर आरोप

बनारसच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांबद्दल अखिलेश यादवांना गंभीर आरोप केले आहेत. बनारसचे जिल्हा दंडाधिकारी ईव्हीएम मशिन्सबाबत फेरफार करत आहेत असा आरोप करुन ते प्रशासनाशी बेईमानी करत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अखिलेश यांनी आता माझा निवडणूक आयोगावर विश्वास नसल्याचे सांगून याप्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमावी अशी मागणी त्यांनी केली आहे. वाराणसीमध्येही ईव्हीएम मशिन्सबाबतही तोच घोटाळा करण्यात आला आहे. त्यामुळे वाराणसीमधील निवडणूक अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी असा आरोप त्यांना लावला आहे. एक्झिट पोलवर जोरदार टीका करत ते म्हणतात की, एक्झिट पोल वाहिन्यांना फुकट देतात का असा सवाल उपस्थित करुन ज्यांना लोकशाही वाचवायची आहे त्यांना पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Gaziabad Suicide : गाझियाबादमध्ये आर्थिक विवंचनेतून महिलेची मुलांसह आत्महत्या, वाचा नेमके काय घडले ?

आमचे मित्र फडणवीस नटसम्राट आहेत, व्हिडिओचं डबिंग केलेलं असू शकतं-नाना पटोले

Video : देवेंद्र फडणवीसांचा पेनड्राईव्ह बॉम्ब! विशेष सरकारी वकिलांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये गिरीश महाजनांबाबत कोणता गौप्यस्फोट?