मोठी बातमी! आणखी एका पक्षाचे आमदार फुटले, भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश, बंडखोरीमुळे राजकीय गणितच बदललं
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आता आणखी एका पक्षाचे आमदार फुटले असून, भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश झाला आहे. या बंडखोरीमुळे येणाऱ्या काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी पुन्हा एकदा भाजपला कौल दिला आणि देशात सलग तिसऱ्यांना भाजपाचं सरकार स्थापन झालं. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांपेक्षा यावेळी जरी भाजपकडे संख्याबळ कमी असलं तरी देखील केंद्रात भाजपने एक मजबूत सरकार दिलं आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर देखील विविध राजांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या काही राज्यांचा अपवाद वगळता या राज्यांमध्ये देखील भाजपाने जोरदार यश मिळवलं. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलला पराभवाची धूळ चारत सत्ता स्थापन केली. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का दिला. राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींनंतर इंडिया आघाडीमधून एनडीएमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे प्रवेश सुरू आहेत. इंडिया आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत.
राजकीय वर्तुळातून आता पुन्हा एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुन्हा एकदा इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला मोठा झटका बसला आहे. ऐन उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपने सपाला मोठा धक्का दिला आहे. समाजवादी पक्षाच्या तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये गौरीगंज विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले राकेश प्रताप सिंह, यांच्यासह अयोध्याच्या गोसाईगंज विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभय सिंह आणि कालपी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद चतुर्वेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आह. भाजपच्या राष्ट्रीय महामंत्री स्मृती इरानी आणि प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला हजारो कार्यकर्ते आणि भाजपाचे इतरही आमदार उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमात बोलताना विनोद चतुर्वेदी यांनी अयोध्या येथील राम मंदिराबद्दल केंद्रातील मोदी सरकारचं कौतुक केलं, तसेच भाजपाच्या सत्ता काळात बुंदेलखंडाचा विकास झाल्याचं देखील त्यांनी म्हटलं. जेव्हा राम मंदिराचं उद्घाटन झालं तेव्हा आम्हाला त्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमच्या हायकमांडने परवानगी दिली नव्हती असंही ते यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सपाचे तीन बडे नेते भाजपमध्ये गेल्याने आता सपाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
