AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समृद्धी महामार्गाचे फायदे!

चला तर मग जाणून घेऊयात समृद्धी महामार्गाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी.

समृद्धी महामार्गाचे फायदे!
samruddhi mahamarg Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 11, 2022 | 12:24 PM
Share

भाजप-शिवसेना युतीच्या काळात फडणवीस मुख्यमंत्री असताना या समृद्धी महामार्गाचे बांधकाम सुरू झाले. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन या वर्षाच्या सुरुवातीला होणार होते, परंतु कोविड महामारीमुळे त्याला उशीर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचं लोकार्पण संपन्न झालंय. चला तर मग जाणून घेऊयात समृद्धी महामार्गाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी.

  1. या महामार्गाचं हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं अधिकृत नामकरण करण्यात आलंय. मुंबई-नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे म्हणूनही त्याची ओळख आहे.
  2. सरकारच्या मते, 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भ या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. हे दोन्ही प्रदेश दुष्काळी भाग आहेत.
  3. हा एक्स्प्रेस वे 520 किमीसाठी सज्ज असला तरी उर्वरित 181 किमीचा महामार्ग 2024 पर्यंत तयार होईल. यामुळे शिर्डी आणि मुंबई जोडली जाणारे आणि महामार्ग भिवंडी जिल्ह्यात संपणार आहे.
  4. नागपूरहून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या (JNPT) दिशेने जाणाऱ्या व्यावसायिक वाहनांद्वारे द्रुतगती मार्गाचा वापर केला जाणार असल्याने, ठाण्यातील वडपे ते माजिवडा या भागांदरम्यानच्या साडेतीन किलोमीटर लांबीच्या मुंबई-नाशिक महामार्गाचे (NH3) नूतनीकरण करण्याचाही सरकारचा विचार आहे.
  5. एक्स्प्रेस वे खुला झाल्यानंतर राज्यातील पर्यटनालाही चालना मिळेल अशी अपेक्षा आहे कारण यामुळे शिर्डी, लोणार सरोवर, वेरूळ, अजिंठा, औरंगाबाद, एलोरा, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, घृष्णेश्वर, पंचवटी आणि इगतपुरी मधील हिल स्टेशन जोडले जाणार आहेत.
  6. महामार्गामुळे नागपूर ते मुंबई प्रवासाचा वेळ जवळपास सहा तासांनी कमी होणार आहे. सध्या मुंबई-धुळे (NH3) आणि धुळे-नागपूर (NH6) दरम्यानचा प्रवासाचा वेळ 16 तासांच्या जवळपास आहे. म्हणजे नागपूर ते मुंबई अंतर जवळपास 9 ते 10 तासात पार करता येणार.
  7. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे अंदाजे 55 हजार कोटी रुपये खर्चून आठ पदरी मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती महामार्ग बांधण्यात येत आहे.
  8. हा द्रुतगती मार्ग राज्यातील 14 जिल्हे, सहा तालुके आणि 392 गावांमधून जाणार आहे.
  9. हा महामार्ग देशातील सर्वात वेगवान महामार्ग म्हणूनही ओळखला जात आहे. या महामार्गावर आपण 150 किमी प्रतितास वेगाने वाहन चालवू शकतो.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.