AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INS Vikrant: गोळवलकर, देवरस, मुखर्जी, हेडगेवार, भागवतांचा जीव तीळ तीळ तुटला असेल; राऊतांची खोचक टीका

INS Vikrant: सेव्ह विक्रांत मोहिमेत झालेल्या भ्रष्टाचारावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपला (bjp) चांगलंच फैलावर घेतलं आहे. भ्रष्टाचार करणाऱ्याला तुरुंगात पाठवण्याची तरतूद आहे.

INS Vikrant: गोळवलकर, देवरस, मुखर्जी, हेडगेवार, भागवतांचा जीव तीळ तीळ तुटला असेल; राऊतांची खोचक टीका
गोळवलकर, देवरस, मुखर्जी, हेडगेवार, भागवतांचा जीव तीळ तीळ तुटला असेल; राऊतांची खोचक टीकाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 07, 2022 | 11:54 AM
Share

नवी दिल्ली: सेव्ह विक्रांत (INS Vikrant) मोहिमेत झालेल्या भ्रष्टाचारावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपला (bjp) चांगलंच फैलावर घेतलं आहे. भ्रष्टाचार करणाऱ्याला तुरुंगात पाठवण्याची तरतूद आहे. आपल्या देशात घोटाळेबाजांना परदेशात पाठवलं जातं हे सोडून द्या. पण आयएनएस विक्रांत संदर्भात देशभावना, लोकभावनेशी खेळ करून, सैनिकांच्या भावनेचा बाजारात लिलाव करून मातृभूमीचा लिलाव करणारे बाजार मांडणारे भाजपचे महात्मा किरीट सोमय्या आणि त्यांचे महापुत्र नील किरीट सोमय्या यांच्या एका भयंकर राष्ट्रद्रोही प्रकरण बाहेर काढलं. मला फडणवीसांचं आश्चर्य वाटतं. ते राष्ट्रभक्तीची गाणी ऐकवतात. त्यावर भाषण देतात, दुसऱ्यांना हिंदुत्व शिकवतात आणि काल त्यांनी ज्या पद्धतीने देशद्रोही व्यक्तीची बाजू घेऊन वकिली करण्याचा प्रयत्न केला. ते पाहून गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, डॉ. हेडगेवार, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मोहन भागवत यांचा जीव तीळ तीळ तुटला असेल, असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. केंद्रीय यंत्रणांचा खुळखुळा केला आहे. शक्ती प्रदर्शन नाही. तुम्ही आमच्या पाठिमागून कितीही वार करा. शिवसैनिकांचं मनोबल खचलं नाही. उलट आम्ही अधिक जोरात आहोत. भाजपच्या भ्रष्टाचाऱ्यांना जातील तिथे जोड्या मारल्याशिवाय जनता राहणार नाही. तुमची नाटकं आणि नौटंक्या खूप झाल्या. देशाचं रक्षण करणं हा महाराष्ट्राचा पिढीजात धंदा आहे. कुणी गद्दार या मातीत निपजला असेल तर त्याला मातीत गाडल्याशिवाय राहत नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

आधी हिशोब द्या, मग पुरावे देतो

विक्रांताचा विषय संपणार नाही. या भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी आहे. देशभरात पैसा जमा केला. महाराष्ट्रातील 58 कोटींचा आकडा सांगितला. विक्रांतला 200 कोटी जमा करायचे होते. त्यापेक्षा जास्त जमा केला. सोमय्यांनी हा पैसा निवडणुकीत वापरला. हा पैसा पीएमसी बँकेच्या माध्यमातून चालनातून आणला गेला. निल सोमय्यांच्या उद्योगात हा पैसा वापरला. तुम्ही म्हणाल पुरावे कुठे? मी त्यांना सांगतो आधी हिशोब द्या. मग पुरावे देतो, असं राऊत म्हणाले.

11 बॉक्समधून पैसा गोळा केला

11 मोठे बॉक्स पैसे गोळा करण्यासाठी वापरले गेले. हे पैसे त्यांच्या निलम नगरमधील कार्यालयात ठेवले. त्या पैशाचे बंडल बांधण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते बोलवले होते. त्यानंतर पीएमसी बँकेतून पैसे वळवले. जुहूला एका बिल्डरच्या कार्यालयात हे बॉक्स ठेवले. हे मनी लॉन्ड्रिंगच आहे. याला पीएमएलए कायदा लागू शकतो. ईडी जर बटिक नसेल तर कारवाई करेल. पण काल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

INS Vikrant: तुम्ही काय Xपटलं, तुम्ही काय कापलं सांगा?; संजय राऊतांचा पहिल्यांदाच थेट फडणवीसांवर हल्ला

‘INS विक्रांत’ हा सर्वात मोठा घोटाळा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, संजय राऊत आक्रमक

Maharashtra News Live Update : साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...