AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्व काही आलबेल आहे, चिंता नसावी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेताच संजय राऊत यांची एका वाक्यात प्रतिक्रिया

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेला पूर्णपणे घेरण्याची तयारी भाजप-शिंदे गटाने केली असतानाच शिवसेना-काँग्रेसमधील वादावर आता पडदा पडण्याचे संकेत आहेत.

सर्व काही आलबेल आहे, चिंता नसावी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेताच संजय राऊत यांची एका वाक्यात प्रतिक्रिया
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 29, 2023 | 4:06 PM
Share

नवी दिल्ली : शिवसेना आणि काँग्रेसमधील स्वातंत्र्यवीर सावरकर (Savarkar) यांच्या वादावर आता पूर्णपणे पडदा पडल्यात जमा आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नुकताच याबाबत सूचक संदेश दिला आहे. नवी दिल्लीत ठाकरे समर्थक शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतीच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी तथा राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून सावरकरांच्या मुद्दयावरून शिवसेना आणि काँग्रेसमधील वातावरण ताणलं गेलं होतं. वीर सावरकर यांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिला होता. तर राहुल गांधीदेखील आपल्या भूमिकेवर ठाम होते. मात्र विरोधकांच्या एकजूट होण्यासाठी हा मुद्दा वगळण्यात यावा, अशी गळ काँग्रेस नेत्यांना घातली जात होती. अखेर या वादावर पडदा पडल्याचं दिसून येतंय.

संजय राऊत यांचं ट्विट काय?

महाराष्ट्रात शिंदे-भाजप तर केंद्रात भाजपच्या सत्तेविरूद्ध लढण्यासाठी विरोधकांची एकजूट अत्यंत महत्त्वाची आहे. असे असतानाच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत मात्र सावरकर यांच्या मुद्द्यावरून बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. भाजपने हाच मुद्दा उचलून उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे घेरण्याची तयारी केली होती. अखेर आज संजय राऊत यांनी या प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. तसेच महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे. चिंता नको, अशी माहिती ट्विटरद्वारे दिली.

‘गिरीश बापटांच्या जाण्याने महाराष्ट्राचं नुकसान’

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात आज महत्त्वाची घटना घडली. पुण्यातील भाजप खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं. यावरून संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ मिश्कील बोलणारे चैतन्य असलेले गिरीश बापट आम्ही पाहीले. ते जुन्या पढडीतले आहेत. जे राजकारण चाललंय त्यात ते बसणारे नाहीत. सर्वांना एकत्र घेऊन त्यांनी काम केलं. ब्राम्हण चेहरा असला तरी बहुजनांना ते आपले वाटत होते. ती क्वालिटी आज भाजप च्या नेत्यात नाही. पुण्यात भाजप रूजवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. राजकीय कार्यकर्त्यांना त्यांचे मार्गदर्शन सतत लाभत होते. इथेही आम्हाला जेंव्हा भेटत होते तेंव्हा राजकीय मतभेद बाजूला सारून भेटायचे. त्यांनी कधीही कटुता बाळगली नाही. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचं नुकसान झालं

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...