सरपंचाने बनवून दिलं चारित्र्याचं प्रमाणपत्र, लिहिली अशी गोष्ट, लोक म्हणाले शत्रू पण असं काम करणार नाही
अनेकदा एखाद्या सरकारी कामासाठी तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्राची गरज भासते. हे चारित्र्याच प्रमाणपत्र शहरी भागांमध्ये तेथील नगरसेवकाकडून आणि गावात सरपंचाकडून घेतलं जातं. असंच एक चारित्र्याचं प्रमाणपत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

अनेकदा एखाद्या सरकारी कामासाठी तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्राची गरज भासते. हे चारित्र्याच प्रमाणपत्र शहरी भागांमध्ये तेथील नगरसेवकाकडून आणि गावात सरपंचाकडून घेतलं जातं. सामान्यपणे चारित्र्य प्रमाणपत्रात संबंधित व्यक्तीबद्दल चांगल्या-चांगल्या गोष्टी लिहिलेल्या असतात, तुम्ही संबंधित संस्थेला हे चारित्र्याचं प्रमाणपत्र दिल्यानंतर तुमचं काम पूर्ण होतं. मात्र तु्म्हाला नगरसेवकानं किंवा सरपंचाने दिलेल्या चारित्र्य प्रमाणपत्रात जर काही गडबड असेल तर मात्र तुमच्या कामात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. नुकताच असाच एक प्रकार एका व्यक्तीच्या बाबतीत घडला आहे, या वक्तीला त्याच्या गावच्या सरपंचांनी दिलेलं चारित्र्याचं प्रमाणपत्र इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झालं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
सध्या सोशल मीडियावर एक चारित्र्याचं प्रमाणपत्र प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र हे प्रमाणपत्र खोट आहे की खरं? याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेला नाहीये. मात्र हे प्रमाणपत्र ज्या पद्धतीनं लिहिण्यात आलं आहे, ते पाहून हे खरं असावं असं वाटत आहे. हे चारित्र्याचं प्रमाणपत्र ज्ञानचंद्र बैरवा नावाच्या व्यक्तीचं आहे. हा व्यक्ती राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातल्या जयसिंहपूरा गावचा रहिवासी आहे, हे प्रमाणपत्र देखील त्याला जयसिंहपूराच्या सरपंचांनीच दिलं आहे.
View this post on Instagram
या चारित्र्य प्रमाणपत्रामध्ये सुरुवातील या व्यक्तीचं त्याच्या वडिलाचं आणि त्याचं आडनाव लिहिलेलं आहे. मात्र या पत्रात जो मजकूर लिलिहेला आहे, तो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकजण तर हसू देखील आवरू शकले नाहीत. त्यामध्ये स्पष्ट शब्दात लिहीलं आहे की, मी या व्यक्तीला चांगलं ओळखतो. हा एक भांडखोर आणि शिवीगाळ करणारा व्यक्ती आहे. त्यानंतर या प्रमाणपत्राच्या खाली सरपंचांची सही देखील आहे. हे चारित्र्याचं प्रमाणपत्र त्याला 20 जुलै 2019 साली देण्यात आलं आहे, मात्र या चारित्र्याच्या प्रमाणपत्रामुळे या व्यक्तीच्या अडचणीत नक्कीच वाढ झाली असणार एवढं नक्की. हे चारित्र्याचं प्रमाणपत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्याच्यावर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.