जेएनयूमध्ये ‘डॉक्युमेंटरी’ दाखवण्यावरुन राडा; वीजप्रवाह खंडीत, इंटरनेटही बंद

| Updated on: Jan 25, 2023 | 12:24 AM

जेएनयूमधील कॅम्पसमध्ये रात्री 9 वाजता बीबीसी डॉक्युमेंट्री दाखवण्यात येणार होती, मात्र रात्री साडे आठ वाजता अचानक संपूर्ण जेएनयू कॅम्पसमधील वीज गायब झाली होती.

जेएनयूमध्ये डॉक्युमेंटरी दाखवण्यावरुन राडा; वीजप्रवाह खंडीत, इंटरनेटही बंद
Follow us on

नवी दिल्लीः दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीने केलेला माहितीपट दाखवल्याबद्दल जेएनयू आणि डाव्या विचारसरणीतील लोकांमध्ये वाद सरु झाले आहेत. या प्रकरणावरून मंगळवारी रात्री उशिरा अभाविप आणि डाव्या विद्यार्थ्यांमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. ही डॉक्युमेंटरी दाखवण्यास विद्यापीठ प्रशासनाच्या नकारानंतरही जेएनयू्च्या अध्यक्षांनी या माहितीपटाचे स्कीनिंग होणार असल्याचा दावा केला.

त्यानंतर मंगळवारी 9 वाजता या माहितीपट दाखवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर जेएनयू विद्यापीठ परिसरातील वीज आणि इंटरनेट सेवाच बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

त्यानंतर डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगमुळे जेएनयू कॅम्पसमधील वातावरण आणखी बिघडले आहे. या घटनेनंतर कॅम्पसमध्ये मोठ्या संख्येने साध्या गणवेशातील महिला आणि पुरुष पोलीस कर्मचारी तैनात केले गेले आहेत. याबाबत कोणतीही तक्रार झाली तर गुन्हा नोंद केला जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या एनएसयूआयच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नीरज कुंदन यांनी सांगितले की, तुम्ही बीबीसीने केलेल्या माहितीपटावर बंदी घालू शकता मात्र भारतातील माध्यमांचे काय करणार असा सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे आ्ता हा माहितीपट देशभरातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये दाखवला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जेएनयूमधील कॅम्पसमध्ये रात्री 9 वाजता बीबीसी डॉक्युमेंट्री दाखवण्यात येणार होती, मात्र रात्री साडे आठ वाजता अचानक संपूर्ण जेएनयू कॅम्पसमधील वीज गायब झाली होती.

याबद्दल संशोधक विद्यार्थी विवेक यांनी सांगितले की, संपूर्ण कॅम्पसमधी वीज घालवणे चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्क्रीनिंगला घाबरतात का? मागच्या वेळीही जेएनयूमध्ये वीज कापण्यात आली होती.

बाहेरील अराजक शक्ती विद्यापीठात घुसल्या आहेत असा आरोपही विद्यापीठावर करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात दिवे बंद झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होणार आहे त्याला जेएनयू प्रशासन जबाबदार राहणार का असा सवाल विद्यार्थ्यानी केला आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये सोमवारी विद्यार्थी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वादग्रस्त बीबीसी डॉक्युमेंट्रीचे प्रदर्शन त्यांच्या कार्यालयात करणार असल्याचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.

त्यानंतर या नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याची धमकी विद्यापीठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती.

तर त्याच वेळी, सरकारने शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर आणि यूट्यूबला इंडिया: द मोदी प्रश्न या माहितीपटाच्या लिंक ब्लॉक केल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने हा माहितीपट प्रचाराचा भाग म्हणून फेटाळून लावला आहे आणि म्हटले की त्यात वस्तुनिष्ठतेचा अभाव आहे.