Budget Marathi 2021-22 | दिल्लीतील शेतकरी आंदोलनात महिला, विद्यार्थ्यांची उडी; अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सीतारमण यांच्या सुरक्षेत वाढ

शेतकरी आंदोलनाची तीव्रता पाहता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. (security Nirmala Sitharaman budget presentation)

Budget Marathi 2021-22 | दिल्लीतील शेतकरी आंदोलनात महिला, विद्यार्थ्यांची उडी; अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सीतारमण यांच्या सुरक्षेत वाढ
निर्मला सीतारमण
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 8:30 AM

नवी दिल्ली : मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प आज सादर करणार आहे. निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) सकाळी 11 वाजता (1 फेब्रुवारी) संसदेत अर्थसंकल्प सादर (budget presentatio) करतील. मात्र, या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. टिकरी बॉर्डरवर शेतकऱ्यांच्या आंदोलनात महिला आणि विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता पाहता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. (security of Nirmala Sitharaman has been increased on occasion of budget presentation)

सीतारमण यांच्या सुरक्षेत वाढ

कोरोना महामारीमुळे उद्योग, रोजगार आदी क्षेत्रात देशाची पिछेहाट झालेली असताना आज केंद्र सरकार आपला तिसरा अर्थसंकल्प सादर करणार आहे. मात्र, अर्थसंकल्प सादर करत असताना मागील दोन महिन्यांपासून सुरु असलेले दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आपले आंदोलन आणखी तीव्र करणार आहेत. ही बाब लक्षात घेता खबरदारी म्हणून गाजीपूर सीमेचा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मात्र, असे असले तरी दिल्लीच्या टीकरी सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनात आणखी महिला सहभागी होणार आहेत. या आंदोलनात विद्यार्थीदेखील उडी घेणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता एकीकडे देशाचा अर्थसंकल्प सादर होत असताना दुसरीकडे शेतकऱी आंदोलनात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. यामुळेच आंदोलनाची तीव्रता आणि संसदेत सादर होणारा अर्थसंकल्प या दोन्ही गोष्टी लक्षात घेता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

सरकार पुन्हा शेतकऱ्यांना भेटणार

संसदेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना सरकार पुन्हा एकदा भेटण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केलेली तरतूद घेऊन सरकार शेतकऱ्यांना उद्या (2 फेब्रुवारी भेटण्याची शक्यता आहे. मात्र, उद्याच्या सरकार-शेतकरी यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

Budget 2021-22 : कृषी, आरोग्य, शिक्षणासाठी काय तरतूद?, सामान्यांना कोणता दिलासा?, अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष

Farmer Protest : ‘शरद पवारांकडून खोटा प्रचार, नव्या कायद्यांमुळे APMCवर परिणाम नाही’, कृषी मंत्र्यांचा पलटवार

Budget Marathi 2021 LIVE : निर्मला सीतारमण बजेट मांडणार, महत्त्वाच्या घोषणांकडे लक्ष

(security of Nirmala Sitharaman has been increased on occasion of budget presentation)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.