AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Seema Haider Case | सीमा हैदरचे दिवस फिरले, प्रकरण ATS कडे, थेट तुरुंगात होऊ शकते रवानगी

Seema Haider Case | चर्चेत असलेल्या सीमा हैदरचे बुरे दिन शुरु. सीमाने हा प्रवास कसा केला? त्याचा तपास यूपी ATS ने सुरु केला आहे. सोशल मीडियावर सीमा हैदरबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत.

Seema Haider Case | सीमा हैदरचे दिवस फिरले, प्रकरण ATS कडे, थेट तुरुंगात होऊ शकते रवानगी
Seema Haider Case
| Updated on: Jul 17, 2023 | 10:59 AM
Share

लखनऊ : सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचीच सर्वत्र चर्चा आहे. सोशल मीडियावर दरदिवशी तिच्याबद्दल नवनवीन खुलासे होत आहेत. आता उत्तर प्रदेशच्या ATS ने सीमा हैदर प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सीमा हैदर पाकिस्तानातून दुबईला गेली. तिथून नेपाळमार्गे प्रियकर सचिन मीणाला भेटण्यासाठी भारतात दाखल झाली. सीमाने हा प्रवास कसा केला? त्याचा तपास यूपी ATS ने सुरु केला आहे.

पाकिस्तान ते भारत यात्रे दरम्यान सीमा कोणा-कोणासोबत बोलली? तिने किती जणांना फोन केले? याचा एटीएस अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला आहे. ATS सीमाच्या कुटुंबाची पार्श्वभूमी शोधून काढण्याच्या मागे लागली आहे.

काय मागणी होती?

सोशल मीडियावर सीमा हैदरबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. यात ती पाकिस्तानी हेर असल्याचा बोललं जातय. अनेक जण सीमा हैदरच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत होते.

पोलिसांनी काय तयार केलीय?

सीमा हैदर विरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली होती. सध्या ती जामिनावर बाहेर आहे. नोएड पोलीस सीमाच्या जामीन अर्जाला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. केंद्रीय यंत्रणांच्या सूचनेनंतर नोएडा पोलीस सर्तक झाले आहेत. सीमा हैदर सध्या जिथे राहतेय, तिथे साध्या कपड्यातील पोलीस तैनात आहेत. सीमा फरार होऊ शकते, असं पोलिसांना वाटतं. पोलीस सीमाच्या जामिनाविरोधात कोर्टात याचिका दाखल करु शकतात. सीमा सध्या कुठे आहे?

पबजी गेमच्या माध्यमातून सचिनशी भेट झाल्याच सीमाने सांगितलं होतं. गेम खेळताना तिचं सचिन बरोबर बोलणं व्हायचं. त्यानंतर मोबाईलवरुन दोघांमध्ये बोलणं सुरु झालं. ही चर्चा पुढे प्रेमात बदलली. सीमा सध्या नोएडाच्या रब्बूपुरा गावात सचिनच्या घरी राहतेय. सीमा आपल्यासोबत चार मुलांना सुद्धा घेऊन आलीय.

मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर.
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक.
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.