पाकिस्तानात परत ये, गुलाम भाई माफ करतील; बहिणीची साद, सीमा हैदर पाकिस्तानात परतणार?

पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान सीमा हैदरला पाकिस्तानातून तिची बहीण रीमाचा बुलावा आला आहे. रीमाने एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे.

पाकिस्तानात परत ये, गुलाम भाई माफ करतील; बहिणीची साद, सीमा हैदर पाकिस्तानात परतणार?
Seema Haider
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 10, 2025 | 8:10 PM

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर परिस्थिती नाजूक झाली आहे. भारत सरकारने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. या घटनेमुळे पाकिस्तानातून येऊन नोएडामध्ये राहत असलेली सीमा हैदर गप्प आहे. तरीही ती चर्चेत आहे. सध्या सीमा हैदरची चर्चा एका व्हिडिओमुळे होत आहे. हा व्हिडिओ सीमा हैदरच्या बहिणीचा, रीमा हैदरचा आहे आणि तो सोशल मीडियावर तिचा पहिला पती गुलाम हैदरने अपलोड केला आहे.

व्हिडिओमध्ये रीमा हैदर रडताना सीमा हैदरला मायदेशी परत येण्याचे आवाहन करत आहे. ती म्हणते की, ऑपरेशन सिंदूरमुळे भारतातील परिस्थिती ठिक नाही. अशा वेळी मुलांसह तिथे राहणे योग्य नाही. या व्हिडिओमध्ये ती म्हणते की, मायदेशी परत आल्यास येथे कोणी काही बोलणार नाही, उलट गुलाम भाई पूर्वीप्रमाणेच तिला स्वीकारतील. व्हिडिओमध्ये रीमा म्हणते की, भारतातील लोक तिला पाठवू इच्छितात, मग ती का येत नाही?
वाचा: तुर्कीला शस्त्रांपेक्षा कुत्र्यांची सर्वाधिक भीती, टेन्शन इतकं की बलाढ्य देशाने घेतला हा निर्णय…

सीमाच्या रक्तात आहे पाकिस्तान

व्हिडिओमध्ये रीमा तिच्या बहिणीला, सीमा हैदरला आठवण करून देत आहे की ती गुलामची पत्नी आहे आणि अजूनही त्यांचा घटस्फोट झालेला नाही. याच व्हिडिओमध्ये रीमा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेही विनंती करते की, सीमाच्या मायदेशी परतण्यासाठी तिला मदत करावी. रीमाने दावा केला की, भारतात सीमाला धमकावून खोटे बोलायला लावले जात आहे. तिला पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा द्यायला भाग पाडले जात आहे, पण पाकिस्तान तिच्या रक्तात आहे.

पहलगामनंतरपासून सीमा शांत

सीमा हैदर सध्या पूर्णपणे शांत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर तिची ही शांतता दिसून येत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून तिने सोशल मीडियावर कोणताही व्हिडिओ अपलोड केलेला नाही. असे सांगितले जात आहे की, पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर सीमालाही भीती वाटत आहे की, कदाचित तिला पाकिस्तानला पाठवले जाईल. सीमा हैदर 2023 मध्ये बेकायदेशीरपणे नेपाळच्या मार्गाने भारतात आली होती आणि तेव्हापासून ती नोएडाच्या रबूपुरा येथे राहणाऱ्या सचिन मीणा याची पत्नी बनून त्याच्या घरी राहत आहे.