AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Seema Haider : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हीने प्रेग्नसीबाबत केला मोठा खुलासा, स्पष्टच सांगितलं की..

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हीने आपल्या प्रेग्नसीबाबत मोठा खुलासा केला आहे. सीमा हैदर हीला आधीच चार मुलं आहेत. त्यामुळे आता याबाबत नव्याने चर्चा रंगली आहे.

Seema Haider : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हीने प्रेग्नसीबाबत केला मोठा खुलासा, स्पष्टच सांगितलं की..
Seema Haider : पाकिस्तानातून आलेली सीमा हैदर प्रेग्नंट! यावर ती काय म्हणाली ते वाचा
| Updated on: Aug 13, 2023 | 9:10 PM
Share

नवी दिल्ली : पाकिस्तानी सीमा हैदर सध्या पती सचिन मीणा याच्यासोबत ग्रेटर नोएडा येतील घरात राहत आहे. 13 मे रोजी अवैधरित्या भारतात येऊन वास्तव्य करत आहे. सीमा हैदर हिची चौकशी पूर्ण झाली असून तिला तिच्या चार मुलांसह पाकिस्तानात पाठवलं जाईल असं सांगण्यात येत आहे. पण एका बातमींने खळबळ उडाली आहे. सीमा हिची तब्येत ढासळल्याने सचिन तिला रेग्युलर चेकअपसाठी घेऊन जात होता. त्यामुळे सीमा हैदर प्रेग्नंट असल्याचं सांगितलं जात आहे. इतकंच काय तर गरोदर असून पाच महिने झाल्याची चर्चा रंगली आहे.

काय म्हणाली सीमा हैदर?

सीमा हैदर हीनेच खुलासा केला आहे.हा व्यक्तिगत प्रश्न असून मीडियात याबाबत चर्चा करण्याची गरज नाही असं तिने सांगितलं. तसंच जेव्हा काही असेल तेव्हा सर्वांना कळेल असं तिन सांगितलं. सीमा हैदर गेल्या काही दिवसांपासून भारतीय नागरिकता मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. सचिनशी नेपाळमध्ये लग्न केलं असून धर्म परिवर्तन केल्याचं तिने सांगितलं आहे. त्यामुळे भारतीय नागरिकत्व मिळावं अशी मागणी करत आहे. दया आणि सामाजिक आधारावर सीमाला भारतीय नागरिकत्व मिळू शकते. पण जन्माच्या आधारावर सचिन मीणा आणि सीमा हैदर यांच्या मुलाला नागरिकत्व मिळू शकत नाही.

2004 नंतर माता पिता पैकी एक भारतीय असेल आणि दुसरा अवैधरित्या घुसखोरी करून आला असेल तर त्यांच्या मुलाला नागरिकता मिळणार नाही. 2004 पूर्वी असं नव्हतं. दुसरीकडे, सीमा हैदर आणि सचिन मीणा रविवारी घरावर तिरंगा फडकवताना दिसले. तिरंगा फडकवत सीमा हैदर हीने भारतात राहणार असल्याचा आपलं म्हणणं स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे,सीमाचे वकील एपी सिंह याने सांगितलं की, सीमाने कोणतीच फिल्म साईन केलेली नाही. भविष्यात अशी कोणतीच योजना नाही. फिल्म निर्माता अमित जानी यांनी सीमा हैदर हीची भेट घेतली होती. पण अमित जानी यांना आम्ही इथे पाठवलं नव्हतं. या चर्चेत अमित जानी यांनी फसवणूक करत व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओबाबत सीमाला काहीच माहित नाही. ती पाकिस्तानातून इथे चित्रपटात काम करण्यासाठी आली नाही. सीमा सचिनसोबत खूश असल्याचं त्यांनी सांगितलं.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!