भारताने टायमिंग साधला, अमेरिकेला मोठा धक्का, ट्रम्प पहातच राहिले अन् इकडे…
मोठी बातमी समोर येत आहे, भारताने अमेरिकेला आणखी एक धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाकडून कच्च तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावर भारताने अमेरिकेला चांगलचं ठणकावलं होतं. त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे.

एकीकडे अमेरिका आणि भारतामध्ये ट्रेड डिल संदर्भात बोलणी सुरू आहेत. तर दुसरीकडे भारत रशियाकडून खरेदी करत असलेल्या कच्च्या तेलाच्या मुद्द्यावर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न देखील होत आहे. मात्र भारताने यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट करताना आम्हाला जिथून स्वस्तात कच्चं तेल मिळेल तिथून आम्ही ते खरेदी करू असं उत्तर अमेरिकेला दिलं आहे. एवढंच नाही तर त्यानंतर भारताने अमेरिकेला आणखी एक मोठा झटका दिला आहे, तो म्हणजे अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झाला. याच संधी फायदा घेऊन अमेरिका हा भारताला एलपीजी गॅसचा पुरवठा करणारा सर्वात मोठा निर्यातदार देश बनला होता. मात्र आता इथे देखील भारताने अमेरिकेला मोठा झटका दिला आहे. भारताने आता पुन्हा एकदा आखाती देशांमधून एलपीजी गॅसची खरेदी वाढवली असून, संयुक्त अरब अमीरात (UAE) हा आता अमेरिकेला मागे टाकून भारताला एलपीजीचा पुरवठा करणारा सर्वात मोठा देश बनला आहे.
दरम्यान अमेरिकेला धक्क्यावर धक्के सुरू असतानाच आता भारताने पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका दिला आहे. तो म्हणजे लवकरच आता कॅनडा आणि भारतामध्ये मोठी ट्रेड डिल होणार आहे. अमेरिकेवरील आपलं अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाकडून आता भारतासोबत मोठी ट्रेड डिल करण्यात येणार आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर कॅनडाचे वाणिज्य मंत्री मनिंदर सिद्धू हे भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये ट्रेड डिलबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. गेल्या महिनाभरामध्ये कॅनडाच्या वाणिज्य मंत्र्यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. त्यानंतर आता पतंप्रधान नरेंद्र मोदी देखील येत्या डिसेंबरमध्ये कॅनडाला जाण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थान टाइम्सच्या एका वृत्तानुसार सध्या भारत आणि कॅनडा एका मोठ्या ट्रेड डिलच्या तयारीमध्ये आहेत. सध्या सुरू असलेल्या चर्चेनंतर देखील येत्या नोव्हेंबर महिन्यात या सर्व पार्श्वभूमीवर भारत आणि कॅनडामधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये या ट्रेड डिलसंदर्भात महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो.
