AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहिद आफ्रिदी, फवाद खान, माहिरा…, पाकिस्तानी सेलिब्रिटीजचे सोशल मीडिया अकाउंट 24 तासांत पुन्हा बॅन

पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरील बंदी २ जुलै रोजी उठवण्यात आली होती. त्यांचे अकाउंट भारतात दिसू लागले होते. आता एका दिवसानंतर या अकाउंट्सवर पुन्हा बंदी घालण्यात आली आहे.

शाहिद आफ्रिदी, फवाद खान, माहिरा..., पाकिस्तानी सेलिब्रिटीजचे सोशल मीडिया अकाउंट 24 तासांत पुन्हा बॅन
पाकिस्तानी सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाउंट बंद
| Updated on: Jul 03, 2025 | 9:45 AM
Share

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाला होता. यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात अनेक पावले उचलली. त्यावेळी पाकिस्तानी सेलिब्रिटीजचे सोशल मीडिया अकाऊंट ब्लॉक करण्यात आले होते. त्यातील काही पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरील बंदी २ जुलै रोजी उठवण्यात आली होती. पण एका दिवसानंतर या अकाउंट्सवर पुन्हा बंदी घालण्यात आली आहे.

भारतात अकाउंट दिसू लागल्याने अनेकांना धक्का

पाकिस्तानी सेलिब्रिटी माहिरा खान, मावरा होकेन, यमना जैदी, हानिया आमिर आणि फवाद खान यांच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर २ जुलै रोजी सबा कमर, मावरा होकेन, शाहिद आफ्रिदी, अहद रझा मीर यासारख्या पाकिस्तानी सेलिब्रिटींचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात दिसत होते. तसेच हम टीव्ही, एआरवाय डिजिटल आणि हर पल जिओ सारख्या पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलचा एक्सेस दिसत होता. त्यामुळे अनेकांना धक्का बसला होता. परंतु आता गुरुवारी सकाळपासून या सेलिब्रिटींचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात पुन्हा दिसत नाही.

सिने वर्कर्स असोशिएशनकडून मोदींना पत्र

पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरील बंदी उठवल्यानंतर टीकाही सुरु झाली होती. माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल म्हणाले होते की, बंदी उठवण्यामागील तर्क स्पष्ट नाही. जर ऑपरेशन सिंदूर ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असती तर ही बंदी सुरूच ठेवायला हवी होती. दोन्ही राष्ट्रातील संबंध पुन्हा मैत्रीपूर्ण झाले आहे का?

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशननेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंटवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली. पाकिस्तान पुरस्कृत पहलगाम हल्ल्यानंतर त्यांचे कलाकार आणि चॅनेल भारतात दिसणे हे देशाच्या शहीदांचा अपमान आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यंटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले. तसेच पाकिस्तानमधील अनेक सेलिब्रिटीजचे सोशल मीडिया अकाऊंट बॅन केले. पाकिस्तानमधील १६ यूट्यूब चॅनलही बंद केले. त्यात डॉन न्यूज, समा टीवी, एआरबाय न्यूज आणि जियो न्यूजचा समावेश आहे. या चॅनलकडून भारतविरोधातील कंटेट दिला जात होता.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.