पूर्ण देशच पागल आहे; पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय म्हणत शाहीद अफ्रिदिने काढली रॅली, झाला टीकेचा धनी

सध्या सोशल मीडियावर शाहीद अफ्रिदिने रॅली काढली आहे. या रॅलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून भारतीय नेटकऱ्यांनी अफ्रिदीला चांगलेच सुनावले आहे.

पूर्ण देशच पागल आहे; पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय म्हणत शाहीद अफ्रिदिने काढली रॅली, झाला टीकेचा धनी
Shahid Afridi
Image Credit source: Social Media
| Updated on: May 12, 2025 | 12:43 PM

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी 26 निष्पाप लोकांचा जीव घेतला. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाचे वातावरण होते. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदू’च्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची माहिती भारताच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) रविवारी पुराव्यांसह दिली. त्यानंतर पाकिस्तानकडून भ्रामक दावे करण्यात येत आहे. त्यामध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रीदीचा देखील सहभाग आहे. त्याने चक्क ‘पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय’ असे म्हणत रॅली काढली आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्या झाल्यापासूनच शाहीद अफ्रिदिने बरळत होता. तो सतत भारताचे अपयश असल्याचे सुनवत होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगला धडा शिकवल्यानंतरही तो शांत बसला नाही. तो या सगळ्यात पाकिस्तानही पाकिस्तानचा विजय असे म्हणत आहे. त्याने युद्ध थांबल्यानंतर कराचीमध्ये रॅली काढली आहे. या रॅलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून भारतीय लोकांना हसू अनावर झाले आहे. अनेकांनी कमेंट करत अफ्रिदिला चांगलेच सुनावले आहे.
वाचा: एकत्र फिरले, नूडल्स-आईस्क्रीम खाल्ले; शारीरिक संबंधानंतर बॉयफ्रेंडनेच जे केलं ते पाहून पोलिसांनाही बसला धक्का

काय आहे व्हिडीओ?

व्हिडीओमध्ये शाहीद अफ्रिदी पाकिस्तानी लष्कराच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. तसेच तो एका जीपमध्ये बसलेला आहे. त्याच्यासोबत त्याचे इतर काही सहकारी आहेत. त्याने ही रॅली पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय असे म्हणत काढली आहे. एका एक्स सोशल मीडिया यूजरने शाहीदचा हा व्हिडीओ शेअर करत, ‘पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी शाहीद अफ्रिदीने कराचीमध्ये ही रॅली काढली आहे. बुम बुम आमचा पाकिस्तानच्या लष्कराला पाठिंबा’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

Afridi

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर एका यूजरने कमेंट करत, ‘कोणता इतिहास? यांचा पूर्ण देशच पागल आहे. भीकेत मिळालेल्या माफीला इतिहास सांगत आहेत’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, ‘असं वाटत आहे हा पाकिस्तानचा पुढचा इमरान खान होणार आहे’ अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने, ‘बड़ा दिलवाला देश है पाकिस्तान , तब भी जश्न मनाते है कुछ नहीं हुआ कुछ नहीं हुआ बोलके’ असे म्हटले आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान विरोधात केवळ चार दिवसांत भारताला यश मिळाले. या चार दिवसांच्या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी मारले गेले आहे. ही संख्या १०० पेक्षा जास्त आहे. त्यात पाच मोठ्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. सीमारेषेवर पाकिस्तानचे ४० जवान ठार झाले आहेत. तसेच पाकिस्तानच्या गोळीबारास तोफगोळ्यांनी उत्तर दिले.