वयाच्या 9 व्या वर्षी सोडले घर, 19 व्या वर्षी क्रांतिकारी सन्यासी, स्वातंत्र्यसंग्रामात तुरुंगवास, जाणून घ्या शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वतींविषयी

जेव्हा 1942 साली भारत छोडो आंदोलनाची घोषणा करण्यात आली, त्यावेळी स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी आंदोलनात सहभाग घेतला. वयाच्या 19 व्या वर्षीच ते क्रातीकारी साधू म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्यांना वाराणसीत 9 महिने तर मध्य प्रदेशात 6 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता.

वयाच्या 9 व्या वर्षी सोडले घर, 19 व्या वर्षी क्रांतिकारी सन्यासी, स्वातंत्र्यसंग्रामात तुरुंगवास, जाणून घ्या शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वतींविषयी
शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचे निधनImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 6:22 PM

नरसिंहपूर- ज्योतिर्मठ बर्दीनाथ आणि शारदापीठा द्वारका यांचे शंकराचार्य असलेल्या स्वामी स्वरुपानंद सरस्वती (Shankaracharya Swami Swaroopananda)यांचे वयाच्या 98व्या निधन झाले आहे. मध्य प्रदेशात नरसिंहपूर (Narsinghpur)येथे झोतेश्वरमध्ये असलेल्या परमहंसी गंगा आश्रमात, हार्ट अटॅक आल्यामुळे दुपारी 3वाजून 50 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. स्वरुपानंद सरस्वती यांना हिंदुंचे (Hindu)सर्वात मोठे धर्मगुरु मानण्यात येत होते.

शंकराचार्य गेल्या काही काळापासून आजारी होते. त्यांच्यावर बंगरुळुत उपचार सुरु होते. नुकतेच ते मध्य प्रदेशातील आश्रमात परतले होते. शंकराचार्य यांचे शिष्य ब्रह्म विद्यानंद यांनी सांगितले की- स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांना सोमवारी संध्याकाळी 5 वाजता परमहंसी गंगा आश्रमात समाधी देण्यात येईल. स्वामी शंकराचार्य हे स्वातंत्र्य चळवळीतही सहभागी होते. त्यावेळी त्यांनी तुरुंगवासही सहन केला आहे. राम मंदिर निर्माणासाठी त्यांनी मोठी कायदेशीर लढाई लढली होती.

वयाच्या 9 व्या वर्षी घर सोडून धर्मयात्रेला निघाले होते

शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचा जन्म मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यात दिघोरी गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. लहानपणी त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे नाव पोथीराम उपाध्याय असे ठेवले होते. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांनी घर सोडून धर्मयात्रा सुरु केली होती. याच काळात ते काशीला पोहचले आमि तिथे ब्रह्मलीन स्वामी करपात्री महाराज यांच्याकडून त्यांनी वेदांचे आणि शास्त्रांचे शिक्षण घेतले होते.

हे सुद्धा वाचा

19 व्या वर्षी स्वातंत्र्यसैनिक

जेव्हा 1942 साली भारत छोडो आंदोलनाची घोषणा करण्यात आली, त्यावेळी स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी आंदोलनात सहभाग घेतला. वयाच्या 19 व्या वर्षीच ते क्रातीकारी साधू म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्यांना वाराणसीत 9 महिने तर मध्य प्रदेशात 6 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता.

1981 साली मिळाली शंकराचार्य ही उपाधी

स्वामी स्वरुपानंद 1950 मध्ये सन्यासी झाले होते. ज्योतिर्मठ पीठाचे ब्रह्मलीन शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांनी त्यांना दण्ड सन्यासाची दीक्षा दिली होती. त्यानंतर त्यांना स्वामी स्वरुपानंद सरस्वती या नावाने ओळखण्यात येउ लागले. त्यांना 1981 साली शंकाराचार्य ही उपाधी मिळाली.

राम मंदिराच्या नावावर ऑफिसला केला होता विरोध

स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी राम जन्मभूमी न्यासाच्या नावे विहिप आणि भाजपाला घेरले होते. अयोध्येत मंदिराच्या नावावर विहीप आणि भाजपा अयोध्येत त्यांचे कार्यालय तयार करीत ाहेत, ते मंजूर नसल्याचे त्यांनी म्हटले होते. हिंदूंमध्ये शंकराचार्य हे सर्वात मोठे धर्मगुरु मानले जातात. हिंदूंचे सुप्रीम कोर्ट आपण आहोत, असे ते म्हणाले होते. मंदिराचे रुप धार्मिक असायला हवे त्याला राजकीय रुप देणे अमान्य असल्याचे मत त्यांनी मांडले होते.

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.