AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये?, मोजक्याच नेत्यांशी चर्चा करणार; देशमुख दिल्लीला जाणार की नाही?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बचा आवाज आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. (sharad pawar call ncp leaders meeting in delhi)

शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये?, मोजक्याच नेत्यांशी चर्चा करणार; देशमुख दिल्लीला जाणार की नाही?
शरद पवार
| Updated on: Mar 21, 2021 | 10:08 AM
Share

नवी दिल्ली: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बचा आवाज आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. या लेटरबॉम्बची दखल घेऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना तातडीने दिल्लीला बोलावलं आहे. पवार हे राष्ट्रवादीच्या मोजक्याच नेत्यांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख जाणार की नाही? याबाबत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (sharad pawar call ncp leaders meeting in delhi)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो का? याकडे राज्याचे लक्ष लागलेलं असतानाच दुसरीकडे आता परमबीर सिंग हे या सगळ्या प्रकरणात आणखी काही गौप्यस्फोट करतात का? हेदेखील पाहणं महत्त्वाचं असेल. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली असून परमबीर सिंग हे मात्र मुंबईतल्या मलबार हिल परिसरातील त्यांच्या घरीच असल्याची माहिती मिळतेय.

अजितदादा, पाटील जाणार

शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आज संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यावेळी गृहमंत्री बदलण्याविषयी चर्चा होणार आहे. तसेच परमबीर सिंग यांच्या आरोपातील सत्यतेबाबतही चर्चा करण्यात येणार आहे. या पत्रात सिंग यांनी शरद पवारांनीही गृहमंत्र्यांविरोधात तक्रार केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पवार आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

देशमुखांशी फोनवर चर्चा

दरम्यान, लेटर बॉम्बनंतर पवारांनी देशमुखांशी फोनवरून चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटलांशीही पवारांनी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी या दोन्ही नेत्यांना दिल्लीत पाचारण केल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

गृहमंत्री कायम राहतील

दरम्यान, जयंत पाटील यांनी पवारांनी बोलावलेली बैठक नियोजित असल्याचा दावा केला आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख चांगलं काम करत असून ते कायम राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. विरोधकांची सरकार बरखास्त करण्याची मागणी हस्यास्पद असल्याचंही ते म्हणाले.

राऊत पवारांना भेटणार

शिवसेनेचे नेते संजय राऊतही आज शरद पवारांची दिल्लीत भेट घेणार आहेत. आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास ते पवारांची भेट घेणार आहेत. राऊत यांनीच त्याबाबतची माहिती दिली. (sharad pawar call ncp leaders meeting in delhi)

संबंधित बातम्या:

सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत की नाही हे तपासावं, आत्मपरीक्षण करण्याची वेळ: संजय राऊत

आयुक्तांच्या लेटरबॉम्बनंतर ठाकरे सरकार अडचणीत; संजय राऊतांचं सूचक ट्विट

Parambir Singh Letter Live Updates | शरद पवारांनी दिल्लीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली, गृहमंत्री बदलणार?

(sharad pawar call ncp leaders meeting in delhi)

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.