AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

pawar meet adani | शरद पवार हे गौतम अदानी यांच्या अहमदाबादमधील निवासस्थानी

शरद पवार आणि गौतम अदानी यांची पुन्हा एकदा आज अहमदाबादमध्ये भेट झाली आहे, या भेटीमागे नेमकं काय कारण असेल ही चर्चा सुरु आहे, मात्र या भेटीमागे वेगळंच कारण आहे, कारण यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील पवारांच्या सोबत आहेत.

pawar meet adani | शरद पवार हे गौतम अदानी यांच्या अहमदाबादमधील निवासस्थानी
sharad pawar ncp
| Edited By: | Updated on: Sep 23, 2023 | 12:26 PM
Share

अहमदाबाद  (जयवंत पाटील) | 23 सप्टेंबर 2023 |  शरद पवार हे गौतम अदानी यांच्या अहमदाबादमधील घरी पोहोचले आहेत. शरद पवार हे गौतम अदानी यांच्या घरी पोहचल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार हे नेमक्या कोणत्या कारणासाठी गौतम अदानी यांची अहमदाबादमध्ये, त्यांच्या घरी जावून भेट घेत आहेत, हा प्रश्न असला तरी शरद पवार आणि अदानी यांच्या अहमदाबाद भेटीमागील कारण हे वेगळंच असल्याचंही समोर येत आहे. या आधी गौतम अदानी यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती, यानंतर शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीवर वादंग उठलं होतं.

शरद पवार आणि गौतम अदानी यांची अहमदाबादमध्ये, अदानी यांच्याच घरी भेट झाली, पण एका खासगी कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी शरद पवार हे गौतम अदानी यांच्या भेटीला आले असल्याचं सांगण्यात येत आहे. या आधी गौतम अदानी आणि शरद पवार यांची 20 एप्रिल 2023 रोजी मुंबईत भेट झाली होती, शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात 2 तास चर्चा झाली होती. गौतम अदानी हे हिंडनबर्ग प्रकरणात चर्चेत आले होते, तेव्हा ही भेट झाली होती. यानंतर शरद पवार आणि गौतम अदानी यांची दुसरी भेट 2 जून 2023 रोजी झाली होती, यात त्यांची अर्धातास चर्चा झाली.

राजकीय वर्तुळात मोठी चर्चा

महाराष्ट्रात राजकीय पक्षातील प्रमुख नेते पक्ष सोडून जात असताना, हिंडनबर्ग प्रकरणात गौतम अदानी चर्चेत असताना शरद पवार आणि गौतम अदानी यांची भेट झाली होती. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र गौतम अदानी यांना सतत निशाण्यावर ठेवून केंद्र सरकारवर टीकास्त्र डागणे सुरुच ठेवले आहे. पण शरद पवार आणि गौतम अदानी यांची पहिली भेट झाली तेव्हा या भेटीवर अनेक तर्क काढण्यात आले होते, राजकीय वर्तुळात मोठी चर्चा देखील झाली. पण आजची भेट ही गौतम अदानी यांच्या एका खासगी कार्यक्रमात उपस्थिती लावण्यासाठी शरद पवार यांनी घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी शरद पवार यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभा पवार या देखील असल्याने हे एक कौटुंबिक भेट असू शकते, असं सांगण्यात येत आहे.तर शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने का असेना ही तिसरी भेट 23 सप्टेंबर 2023 रोजी होत आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना