AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महानायक बिग बींनाही आवाजाने भुरळ घालणारे… प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचं निधन

राणा हे देशातील प्रसिद्ध शायरांपैकी एक होते. ते कवी होते. उर्दूसह हिंदी आणि अवधी भाषेत त्यांनी लिखाण केलं होतं. राणा यांनी आपल्या शायरीत वेगवेगळे प्रयोग केले. त्यांनी वेगवेगळ्या शैलीतील गजल प्रसिद्ध केल्या होत्या. ऊर्दु साहित्यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर माटी रतन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

महानायक बिग बींनाही आवाजाने भुरळ घालणारे... प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचं निधन
munawwar ranaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 15, 2024 | 12:31 AM
Share

लखनऊ | 15 जानेवारी 2024 : ‘किसी को घर मिला हिस्से में या कोई दुकाँ आई, मैं घर में सब से छोटा था मेरे हिस्से में माँ आई…’ या अप्रतिम शायरीमुळे देशातील घराघरात पोहोचलेले आणि आपल्या आवाजाने महानायक अमिताभ बच्चन यांनाही भुरळ घालणारे शतकातील महान शायर मुनव्वर राणा यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. राणा गेल्या काही वर्षापासून आजारी होते. त्यांच्यावर अधूनमधून उपचार सुरू होते. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात त्यांनी आज अंतिम श्वास घेतला. ते 71 वर्षाचे होते. राणा यांच्या मुलाने त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे.

मुनव्वर राणा यांना दोन दिवस लखनऊच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. किडनी फेल्युअर झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. आठवड्यातून तीन वेळा त्यांचा डायलिसीस करण्यात येत होतं.त्यांना क्रोनिक किडनीचा आजार होता. त्यामुळेच त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमाला जाणंही बंद केलं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांनी छातीत दुखू लागल्याची तक्रारही केली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना निमोनियाही झाला होता. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होत होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांना रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर ठेवलं होतं. आज अधिकच तब्येत खालावल्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला.

परदेशातही प्रसिद्ध

राणा हे देशातील प्रसिद्ध शायरांपैकी एक होते. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. शाहदाबा या कवितेसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्याशिवाय त्यांना माटी रतन सन्मानानेही पुरस्कृत करण्यात आलं होतं. राणा यांना त्यांच्या आईवरील शायरीने सर्वाधिक प्रसिद्धी मिळवून दिली होती. देशातच नव्हे तर परदेशातही त्यांची लोकप्रियता होती. त्यांचा आवाजही दमदार होता. बॉलिवूड अभिनेते, महानायक अमिताभ बच्चनही त्यांच्या आवाजावर फिदा होते.

वाद आणि राणा

वाद आणि राणा यांचं अतूट नातं होतं. 2022च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी एक धक्कादायक विधान केलं होतं. योगी आदित्यनाथ पुन्हा निवडून आले तर मी यूपी सोडून जाईल. दिल्ली किंवा कोलकाता येथे जाऊन राहीन. माझ्या वडिलांनी पाकिस्तानात जाणं नाकारलं. पण मला मजबुरीने आपलं शहर, प्रदेश आणि माझी माती सोडून जावं लागेल, असं विधान राणा यांनी केलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

कोण होते राणा?

राणा हे देशातील प्रसिद्ध शायरांपैकी एक होते. ते कवी होते. उर्दूसह हिंदी आणि अवधी भाषेत त्यांनी लिखाण केलं होतं. राणा यांनी आपल्या शायरीत वेगवेगळे प्रयोग केले. त्यांनी वेगवेगळ्या शैलीतील गजल प्रसिद्ध केल्या होत्या. ऊर्दु साहित्यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर माटी रतन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर एक वर्षानंतर त्यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परतही केला होता. वाढत्या असहिष्णुतेमुळे त्यांनी सरकारी पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता.

राणा यांची शायरी…

लती फिरती हुई आँखों से अज़ाँ देखी है

मैं ने जन्नत तो नहीं देखी है माँ देखी है

—————–

तुम्हारी आँखों की तौहीन है ज़रा सोचो

तुम्हारा चाहने वाला शराब पीता है

———————-

भी ज़िंदा है माँ मेरी मुझे कुछ भी नहीं होगा

मैं घर से जब निकलता हूँ दुआ भी साथ चलती है

————————-

ब भी कश्ती मिरी सैलाब में आ जाती है

माँ दुआ करती हुई ख़्वाब में आ जाती है

————————–

सो जाते हैं फ़ुटपाथ पे अख़बार बिछा कर

मज़दूर कभी नींद की गोली नहीं खाते

————————-

कुछ बिखरी हुई यादों के क़िस्से भी बहुत थे

कुछ उस ने भी बालों को खुला छोड़ दिया था

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.