AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेंच्या वकिलाचे दोन सर्वात मोठे युक्तिवाद, निकाल फिरणार? झटका कुणाला? कोर्टात काय घडलं?

Shivsena Symbol Live Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीत शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी दोन महत्त्वाचे युक्तिवाद केले. विधिमंडळ पक्षाच्या संख्येनुसार निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य असून, आमदार अपात्रतेचा या प्रकरणाशी संबंध नाही, असे ते म्हणाले. या युक्तिवादामुळे निकालाला कलाटणी मिळणार का, आणि कुणाला धक्का बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदेंच्या वकिलाचे दोन सर्वात मोठे युक्तिवाद, निकाल फिरणार? झटका कुणाला? कोर्टात काय घडलं?
uddhav thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 17, 2026 | 3:50 PM
Share

शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवेळी आज शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी दोन मोठे युक्तिवाद केले आहेत. एक म्हणजे विधिमंडळ पक्षाच्या संख्येवरून निवडणूक आयोगाने दिलेला निकाल कसा बरोबर आहे, हे सांगण्याचा प्रयत्न कौल यांनी केला. तर, दुसरं म्हणजे आमदारांच्या अपात्रतेचा आणि या प्रकरणाचा काहीच संबंध नसल्याचा सर्वात मोठा युक्तिवादही त्यांनी केला. कौल यांच्या या दोन युक्तिवादामुळे शिंदे गटाची बाजू वरकरणी मजबूत वाटत असली तरी कोर्ट त्यावर काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. कौल यांच्या युक्तिवादामुळे निकाल फिरणार का? अशी चर्चा रंगली असून कुणाला झटका बसणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नीजर कौल यांनी आज तिसऱ्या दिवशी कोर्टात युक्तिवादाला सुरुवात केली आहे. शिंदे गटाची बाजू मांडताना निवडणूक आयोगाचा निकाल कसा योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न कौल यांनी केला. आयोग निकाल देताना पूर्णतः विधीमंडळ पक्ष चाचणीवर अवलंबून होतं, त्याला काही कारणं होती. निवडणूक आयोग ही एक महत्वाची संस्था आहे, त्यांना काही अधिकार आहेत आणि ते त्याचा वापर करू शकतात, असा युक्तिवाद नीरज कौल यांनी केला.

उगाच प्रकरण वाढवलं जातंय

आमदारांना मिळालेली मत महत्त्वाची आहेत. सादिक अली प्रकरणात तसं नमूद करण्यात आलं आहे. त्यांच्या आणि आमच्या आमदारांना मिळालेली मते पाहिल्यावर एक रेकगनेशन ठरू शकते. आमच्याकडे पूर्वी असलेल्या आमदारांची संख्या, त्यांना मिळालेली मते, पुढे निवडून आलेले आमदार, त्यांची मतेही आमच्याकडे आहेत, असं सांगतानाच आमदारांच्या अपात्रतेचा आणि या प्रकरणाचा काही संबंध नाही. अपात्रता प्रकरणावर सुनावणी म्हणजे विनाकारण हे मॅटर वाढवल्यासारख आहे. यात उगाच वेळ वाया घातला जातोय असं दिसतं, असा युक्तिवाद कौल यांनी केला.

मते अपात्र होत नाहीत

एखादा आमदार अपात्र झाला तरी त्याला मिळालेली मते अपात्र होत नाहीत. या गोष्टीकडे आपण लक्ष दिल पाहिजे. राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळ राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष यांना वेगळ कस करता येईल? असा सवाल त्यांनी कोर्टाला केला.

Follow Us
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?