शोएब म्हणतो, ‘पाकिस्तान जिंदाबाद’, सानिया मिर्झा म्हणते…

मुंबई : 14 फेब्रुवारीला पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद संघटनेने घडवलेला पुलवाम हल्ला, त्यानंतर या हल्ल्याचा बदला म्हणून भारताच्या वायूसेनेने पाकिस्तानत घुसून बालाकोट येथील जैशच्या दहशतावदी तळांना उद्ध्वस्त केल्याची घटना, त्यानंतर पाकिस्तानची 20 लढाऊ विमानं भारतीय हद्दीत घुसणं, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरही अनेकजण व्यक्त होत आहेत. विशेषत: सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तानसंबंधी विषय येतो, त्यावेळी अनेकदा […]

शोएब म्हणतो, 'पाकिस्तान जिंदाबाद', सानिया मिर्झा म्हणते...
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

मुंबई : 14 फेब्रुवारीला पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद संघटनेने घडवलेला पुलवाम हल्ला, त्यानंतर या हल्ल्याचा बदला म्हणून भारताच्या वायूसेनेने पाकिस्तानत घुसून बालाकोट येथील जैशच्या दहशतावदी तळांना उद्ध्वस्त केल्याची घटना, त्यानंतर पाकिस्तानची 20 लढाऊ विमानं भारतीय हद्दीत घुसणं, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरही अनेकजण व्यक्त होत आहेत. विशेषत: सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तानसंबंधी विषय येतो, त्यावेळी अनेकदा पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा या सेलिब्रेटी दाम्पत्याच्या प्रतिक्रियांकडे दोन्ही देशांमधील नेटिझन्सचं लक्ष असतं.

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा हे ट्विटरवरुन व्यक्त झाले आहेत. दोघांच्या ट्वीटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दोघांचेही ट्वीट वेगवेगळ्या दिवशी असले, तरी दोघांच्या ट्वीटचा संदर्भ हा दोन्ही देशांमधील तणावाच्या स्थितीच्या मुद्द्यांशीच संबंधित आहे.

पाकिस्तानातून अभिनंदन यांना घेऊन येणारी ही महिला कोण?

शोएब मलिकने 27 फेब्रुवारी रोजी ‘हमारा पाकिस्तान जिंदाबाद’ असे ट्वीट केले आहे. 27 फेब्रुवारी म्हणजे भारताने पाकिस्तानात घुसून जैशच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केल्याचा दुसरा दिवस. म्हणजेच, या दिवशी पाकिस्तानचे 20 लढाऊ विमानं भारताच्या हद्दीत घुसले होते. मात्र, भारताच्या जोरदार प्रत्युत्तरानंतर ते माघार पळाले. त्यावेळी शोएब मलिकाने ‘हमारा पाकिस्तान जिंदाबाद’ असे ट्वीट केले होते.

त्याच दिवशी, म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना प्रत्युत्तर देताना, भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडलं. त्यानंतर अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं. अभिनंदन यांची काल म्हणजे 1 मार्च रोजी पाकिस्तानकडून सुटका करण्यात आली.

भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानातून मायदेशी म्हणजेच भारतात परतल्यानंतर भारतीय टेनिसस्टार आणि क्रिकेटर शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झा हिने स्वागताचे ट्वीट केले. शिवाय, ‘जय हिंद’ असेही म्हटले.

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचे लग्न झाले आहे. पारंपरिक शत्रू असलेल्या दोन देशांतील हे दोघेजण, मात्र दोघेही व्यक्त होत असताना, त्यांच्यात समोरील देशाबद्दल शत्रुत्वाची भावना दिसत नाही. आपापल्या देशाचा अभिमान दिसून येतो. किंबहुना, शोएब आणि सानिया हे दोघेही अत्यंत भान बाळगून सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. मात्र, ट्रोलिंग करणारे या ना त्या मार्गाने त्यांना ट्रोल करतातच.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.