Handpump : चक्क हापशातून पाण्याऐवजी येतेय दारू, हा निसर्गाचा चमत्कार की..

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

|

Updated on: Oct 12, 2022 | 3:44 PM

Handpump : हापशातून पाण्याऐवजी दारु यायला लागली तर तळीरामांची कोण मज्जा नाही का?..तर मध्यप्रदेशातील अशाच एक हापशातून पाण्याऐवजी दारु बाहेर पडत आहे..

Handpump : चक्क हापशातून पाण्याऐवजी येतेय दारू, हा निसर्गाचा चमत्कार की..
पाणी नव्हे चक्क दारूचा हापसा
Image Credit source: सोशल मीडिया

गुना, मध्यप्रदेश : ‘एमपी गजब है, सबसे अजब है’ हे मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) पर्यटन विभागाचे हे ब्रीदवाक्य आहे. तर एमपी खरंच अजब-गजब आहे.  कारण इथल्या एका हपशातून (Handpump) पाण्याऐवजी चक्क दारू (Liquor) बाहेर पडत आहे. पोलिसांनी जेव्हा हापसा हापसला तेव्हा त्यातून पाणी नाही तर दारु बाहेर पडली.  तळीरामांच्या आवडीच्या या बातमी मागील बातमी आहे तरी काय.. ते पाहुयात..

आता हपशातून पाणी नाही तर दारू बाहेर यायला लागली म्हटल्यावर ते पहायला कोण गर्दी उसळली, काय सांगता. या हापशाचे आणि त्यातून निघणाऱ्या दारुचे व्हिडिओ सोशल मीडियावर दणकावून व्हायरल झाले. सर्व राज्यात हा कौतुकाचा विषय झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या दारुचे रहस्य बाहेर आले..

हे सुद्धा वाचा

तर हा किस्सा आहे गुना या मध्यप्रदेशातील जिल्ह्यातील. गुना येथील एका हँडपम्प मधून पाणी नाही तर चक्क दारू बाहेर येत असल्याची चर्चा रंगली होती. पोलिसांनी या विषयात खोलवर जाण्याचा निश्चय केला. या भागात अवैध दारु निर्मिती होत असल्याची पोलिसांना कुणकूण लागली होती.

गुना जिल्ह्यात पोलिसांना एका ठिकाणी अवैध दारु तयार होत असल्याचे कळाले. पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी छापेमारी केली. छापेमारी दरम्यान त्यांना या ठिकाणी खबऱ्याने सांगितल्याप्रमाणे एक हँडपंप दिसला. हा हँडपंप वेगळा असल्याचे त्यांच्या चाणाक्ष नजरेतून सूटले नाही.

पोलिसांनी हा हापसा सुरु केल्यावर त्यातून पाणी नाही तर दारू बाहेर आली. पोलिसांनी जिथे हापसा होता, ती जागा खोदून काढली. तेव्हा त्यांना खाली मद्याचे अनेक ड्रम मिळाले. जमिनीपासून ते 7 फूट खोल गाडण्यात आले होते.या ड्रममध्ये दारू साठवण्यात आली होती.

पोलिसांनी हा परिसर खोदल्यावर तिथे ड्रम आढळून आले. त्यामध्ये अवैध दारू भरलेली होती. गुना जवळ हा अड्डा पोलिसांनी उद्धवस्त केला. हँडपंप सुरु केल्यावर त्यातून दारुची धारच लागली. त्यामुळे अचंबित झालेल्या पोलिसांनी माग काढत या प्रकरणाचा उलगडा केला.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI