CCTV : दारु ढोसून आलेल्यांच्या भांडणात पडला, रस्त्यावर आडवा पाडून दे धपाधप… धपाधप

भररस्त्यात तुंबळ हाणामारी! दारुच्या दुकानाबाहेर झालेला राडा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पाहा Video

CCTV : दारु ढोसून आलेल्यांच्या भांडणात पडला, रस्त्यावर आडवा पाडून दे धपाधप... धपाधप
जबर मारहाणImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 11, 2022 | 10:54 AM

सुनिल जाधव, TV9 मराठी, डोंबिवली : दारु पिऊन राडा करणाऱ्यांचं भांडण सोडवायला जाणं एकाला अंगलट आलं. दारु पिऊन दोन गटात (Drunk people) राडा सुरु होता. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला दोन्ही गटातील तळीरामांनी (Alcoholic) आपला वाद विसरुन उलट त्यालाच बेदम मारहाण केली. रस्त्यावर आडवा पाडून या व्यक्तीला लाथाबु्क्क्यांनी प्रहार करण्यात आले. ही घटना डोंबिवली पश्चिमेत घडली. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली (Dombivli Crime News) पोलीस या घटनेप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

डोंबिवलीतील सिद्धार्थनगर परिसरातील ही घटना घढली. दारूड्यांनी केलेल्या मारहाणीत राजेश शहा नावाचा गृहस्थ जखमी झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून समोर आलेल्या दृष्यांनंतर एकच खळबळ उडालीय.

रात्री साडेअकराच्या सुमारास कोपर रोडला असलेल्या सिद्धार्थनगर परिसरात दोन गटातील बाचाबाची झाली. काही कारणावरुन ऐश्वर्या बारसमोर झिंगलेले अवस्थेत भांडण करायला लागले. भर रस्त्यावर काही वेळात बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं. हा वाद विकोपाला जात संभाव्य विपरीत घटना घडण्याची शक्यता होती.

वाद वाढू नये म्हणून राजेश शहा ही व्यक्ती मध्यस्थी करण्यासाठी, भांडण्या सोडवण्याच्या उद्देशाने पुढे सरसावली. मात्र तळीरामांनी आपला वाद सोडून मध्यस्थी करण्यास गेलेल्या राजेश यांनाच या बेदम मारहाण सुरू केली. हा तमाशा जवळपास एक तास सुरू होता.

याबाबत बार मालकाला माहिती मिळताच तो ही भांडण सोडण्यास गेला. मात्र या तळीरामनी त्याला ही मारहाण केली आणि मग स्वतः पळ काढला. जखमी अवस्थेत असलेल्या राजेश शहा यांनी पोलीस ठाणे गाठलं. आपल्यावर बेतलेला प्रसंग सांगितला आणि तक्रा नोंदवली.

त्यानंतर पोलिसांनी जखमी राजेश यांच्या तक्रारीवरून सम्राट मोरे, योगेश धीवरे विशाल गरुडसह अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सध्या पुढील तपास सुरू आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.