Siddhu in jail: नवज्योतसिंग सिद्धू यांची कोर्टात शरणागती, पटियाला जेलमध्ये रवाना, रोड रेज प्रकरणात एक वर्षांची शिक्षा

चंदीगड – रोड रेज प्रकरणात (road rage case)पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिंद्धू (Navjyot sing Sidhu)यांनी पटियाला कोर्टात शरणागती पत्करली आहे. ते सोबत कपड्यांची बॅग घेऊनच आले. कोर्टात सिद्धूंच्या शरणागतीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली. तिथे सिद्धू यांनी त्यांना गव्हापासून असलेल्या एलर्जीची माहिती दिली. त्यांच्या एका पायावर पट्टाही […]

Siddhu in jail: नवज्योतसिंग सिद्धू यांची कोर्टात शरणागती, पटियाला जेलमध्ये रवाना, रोड रेज प्रकरणात एक वर्षांची शिक्षा
Navjyot singh siddhu surrenderImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 7:19 PM

चंदीगड – रोड रेज प्रकरणात (road rage case)पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिंद्धू (Navjyot sing Sidhu)यांनी पटियाला कोर्टात शरणागती पत्करली आहे. ते सोबत कपड्यांची बॅग घेऊनच आले. कोर्टात सिद्धूंच्या शरणागतीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली. तिथे सिद्धू यांनी त्यांना गव्हापासून असलेल्या एलर्जीची माहिती दिली. त्यांच्या एका पायावर पट्टाही बांधण्यात आला होता. त्यावरुनही त्यांच्या वैद्यकीय रेकॉर्डचीही तपासणी करण्यात आली. पोलीस त्यांना आता घेऊन पटियाला सेंट्रल जेलमध्ये (Patiyala court)पोहचले आहेत. याच जेलमध्ये सिद्धू यांचे कट्टर विरोधक विक्रम मजिठिया ड्रग्ज प्रकरणात बंद आहेत.

सुप्रीम कोर्टात दिलासा नाही

सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. शरणागतीच्या वेळी सिद्धू यांनी कुणाशीही बोलण्यास नकार दिला. सप्रीम कोर्टाने शुक्रवारी क्युरेटिव्ह याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. दुपारी पुन्हा एकदा तत्काळ सुनावणीची मागणी करण्यात येणार असल्याचे सिद्धूंच्या वकिलांनी सांगितले होते, मात्र सुनावणी होऊ शकली नाही.

मुख्य न्यायमूर्तींकडे गेले होते प्रकरण

त्यापूर्वी सिद्धू यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या याचिकेवर न्यायाधीश ए एम खानवीलकर यांनी सांगितले की, हे प्रकरण मुख्य न्यायमूर्तींकडे पाठवित आहोत. तेच या प्रकरणात सुनावणीचा निर्णय़ घेतील. सिद्धू यांनी प्रकृती अस्वस्थ्याचे कारण देत शरणागतीसाठी एका आठवड्याच्या कालावधीची मागणी केली होती.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसच्या नेत्यांनी साथ सोडली

तर पंजाबच्या काँग्रेसच्या नेत्यांनी सिद्धूंची साथ सोडलेली आहे. मात्र काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सिद्धू यांना फोन केला होता. काँग्रेस त्यांच्यासोबत असल्याचे प्रियंकांनी त्यांना सांगितले. सिद्धू यांनी ढळून जाऊ नये यासाठी त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्नही प्रियंकांनी केला. सिद्धू यांना काँग्रेसमध्ये प्रियंकांच्या गटातील मानण्यात येते.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण

1. २७ डिसेंबर १९८८ रोजी सिद्धू यांचे पटियाला येथे पार्किंगवरुन ६५ वर्षांच्या गुरनाम सिंह यांच्याशी भांडण झाले होते. सिद्धू यांनी त्यावेळी गुद्दा मारला होता. त्यानंतर गुरनाम सिंह यांचा मृत्यू झाला. सिद्धू आणि त्यांचे मित्र रुपिंदर सिंह यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

2. २००६ साली हायकोर्टाने सिद्धू यांना ३ वर्षांची शिक्षा आणि एका लाखाचा दंड ठोठावला होता.

3. जानेवारी २००७ मध्ये सिद्धूंनी कोर्टात आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर ते जेलमध्ये गेले. त्यानंतर या प्रकरणात सिद्धू यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

4. १६ मे २०१८ रोजी सिद्धू यांना हत्येच्या आरोपातून मुक्त करण्यात आले. मात्र मारहाणीच्या प्रकरणात एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दरम्यान मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी सुप्रीम कोर्टात पुर्विचार याचिका केली.

5. १९ मे २०२२ रोजी सुप्रीम कोर्टाने निर्णय बदलत सिद्धू यांना मारहाण प्रकरणी एका वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.