
इंडिया सेमीकंडक्टर मिशनद्वारे 2 ते 4 सप्टेंबर दरम्यान नवी दिल्लीतील यशोभूमी कॉन्फरन्स सेंटरमध्ये SEMICON इंडिया 2025 कॉन्फरन्सचे आयोजन केले जाणार आहे. या कॉन्फरन्सपूर्वी अमेरिकन कंपनी सिंक्लेअरचे सीईओ ख्रिस रिपले यांनी भारतात विकसित केलेल्या D2M (डायरेक्ट टू मोबाइल) चिपवर चालवल्या जाणाऱ्या टॅबलेटचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी त्यांनी म्हटले की, “हा टॅबलेट भारतात डिझाइन केलेल्या D2M चिपद्वारे चालवला जातो. भारत वायरलेस तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर डिझाइनमध्ये जगातील इतर देशांपेक्षा पुढे जात आहे. अमेरिकेसह उर्वरित जगात नवोपक्रम आणि नवीन उत्पादने कशी तयार केली जावीत, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.”
आयआयटी कानपूर येथे इन्क्युबेट केलेल्या तेजस नेटवर्क्सची उपकंपनी असलेल्या सांख्य लॅब्सने या चिप्स तयार केल्या आहेत. कमी किमतीच्या D2M चिप्स ग्राहकांना मोबाइल डिव्हाइसवर थेट टेलिव्हिजन सिग्नल मिळून देण्यास सक्षम आहेत. सांख्यने विकसित केलेल्या पृथ्वी-3 ATSC 3.0 चिपसेटद्वारे चालवल्या जातात. सांख्य लॅब्सने मार्क वन नावाचे पहिले D2M स्मार्टफोन डिझाइन देखील विकसित करत आहे. या तंत्रज्ञानाचे गेल्या दोन वर्षांमध्ये बेंगळुरू, दिल्ली आणि अमेरिकेत फील्ड ट्रायल झाले देखील झाल्याची माहिती समोर आली आहे.
#WATCH | Ahead of India’s flagship semiconductor-focused event, Semicon India 2025, Chris Ripley, President and CEO of Sinclair (One of the largest US news media companies), says, “We recognised that the expertise available in India was second to none in the world. We’ve invested… pic.twitter.com/JY48TzFZj0
— ANI (@ANI) September 1, 2025
सांख्यने स्मार्टफोन, यूएसबी डोंगल, गेटवे आणि कमी किमतीचा फीचर फोन देखील तयार केले आहे. हे सर्व डिव्हाईस टेलिव्हिजनमध्ये प्लग इन करता येतात. अशी सुविधा असलेले हे जगातील पहिले तंत्रज्ञान आहे. या चिप्सचा पहिला लूक एप्रिलमध्ये झालेल्या वेव्हज 2025 शिखर परिषदेत समोर आला होता. त्याच टेरेस्ट्रियल टीव्ही ब्रॉडकास्ट एअरवेव्हचा वापर मल्टीमीडिया सामग्रीसह व्हिडिओ, ऑडिओ आणि मेसेज थेट मोबाइल फोनवर शेअर करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. खास बाब म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारच्या वायफाय किंवा इंटरनेट आवश्यकता लागत नाही. सांख्य कंपनीची स्मार्टफोन उत्पादक कंपनी एचएमडी आणि लावा यांच्याशी देखील जवळीक आहे अशी माहिती समोर आली आहे.