Operation Sindoor: दहशतवाद्यांचा काळ बनलेला ‘सिंदूर’चा इतिहास आठ हजार वर्षांचा, वेद-पुराणातही उल्लेख
History Of Sindoor: जुन्या काळात सिंदूर हळद, तुरटी आणि चुना या माध्यमातून बनवले गेले. वेद आणि पुराणात सिंदूरचा उल्लेख आहे. रामायण, महाभारतामध्ये त्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे हिंदू धर्मात सिंदूरला जुन्या काळापासून महत्वाचे स्थान आहे.

History Of Sindoor: पाकिस्तानने भारतावर केलेल्या एअर स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर नाव दिले गेले. या कारवाईला सिंदूर नाव देण्यामागे अनेक महत्वाची कारणे आहेत. सिंदूर हे भारतीय महिलांसाठी सौभाग्याचे प्रतिक आहे. पहलगाम हल्ल्यात पती गमवलेल्या महिलांना या ऑपरेशनद्वारे न्याय मिळावा, हा हेतू आहे. सिंदूरचा रंग शौर्य आणि बलिदानाचे प्रतिक आहे. यामुळे हेच सिंदूर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांसाठी काळ बनला. भारतीय महिलांसाठी महत्वाचे असलेल्या या सिंदूरचा इतिहास सुमारे आठ हजार वर्ष जुना आहे.
हडप्पा संस्कृती ही जगातील प्राचीन ताम्रयुगीन संस्कृतींपैकी एक आहे. जर्नल नेचरमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार सिंधू सभ्यता आठ हजार वर्ष जुनी आहे. ‘सिंधू संस्कृती’ ही सिंधू नदीच्या केंद्रस्थानी होती. ‘सिंधू संस्कृती’चा भाग सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आहे.
सिंदूरचा उपयोग हडप्पा आणि मोहनजोदडो सभ्यतेमध्ये दिसून येतो. उत्खननातून मिळालेल्या अत्यंत प्राचीन मूर्तींवर सिंदूर दिसून आला होता. हडप्पा संस्कृतीचे सर्वात मोठे ठिकाण राखीगढी आहे. त्या ठिकाणी उत्खननादरम्यान महिलांच्या अलंकाराशी संबंधित अनेक गोष्टी मिळाल्या. दगडी मणी, माती, तांबे आणि मातीच्या भांड्यांपासून बनवलेल्या बांगड्या, सोन्याचे दागिने, मातीच्या कपाळाची बिंदी, सिंदूर दाणी, अंगठ्या, कानातले इत्यादी गोष्टी उत्खनातून मिळाल्या. यावरून आठ हजार वर्षांपूर्वीही स्त्रिया सिंदूर लावत असत आणि स्वतःला सजवण्यासाठी बांगड्या, अंगठ्या, बिंदी वापरत होते.
उत्खननातून मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या काळात सिंदूर हळद, तुरटी आणि चुना या माध्यमातून बनवले गेले. वेद आणि पुराणात सिंदूरचा उल्लेख आहे. रामायण, महाभारतामध्ये त्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे हिंदू धर्मात सिंदूरला जुन्या काळापासून महत्वाचे स्थान आहे.
रामायणात सीता माता आणि हनुमान यांच्यातील प्रसंगात सिंदूरचा उल्लेख आला आहे. महाभारतात वस्त्रहरणानंतर द्रौपदीने घेतलेल्या शपथेनंतर सिंदूरचा संदर्भ येतो. दुशासनच्या मृत्यूनंतर त्याचे रक्त द्रौपदीने केसांना लावले होते. त्यानंतरच मांगमध्ये सिंदूर लावले होते. यावरुन हिंदू समाजात सिंदूरचे महत्व दिसून येते.