AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील पहिली 5 स्टार हॉटेल असणारी लग्झरी ट्रेन, सेवेत असणार हॉस्टेस

lagari train in india: रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये 16 कोच असणार आहे. तसेच या ट्रेनमध्ये राजधानीप्रमाणे थर्ड एसी, सेकेंड एसी आणि फर्स्‍ट एसी कोच असणार आहे. बर्थ, एअर डक्ट, केबल डक्ट, वॉशरूमचे डिझाईन राजधानी ट्रेनपेक्षा वेगळे असणार आहे. ही ट्रेन 160 किमी. प्रती तास वेगाने धावू शकते.

देशातील पहिली 5 स्टार हॉटेल असणारी लग्झरी ट्रेन, सेवेत असणार हॉस्टेस
lagari train in india
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 05, 2024 | 11:32 AM
Share

भारतीय रेल्वेत चांगलेच बदल होऊ लागले आहे. सेमी हायस्पीड असणारी वंदे भारतनंतर बुलेट ट्रेन भारतात दाखल होत आहे. त्याचबरोबर आता 5 स्टार हॉटेल असणारी लग्झरी ट्रेन भारतीय रेल्वे सुरु करणार आहे. त्याला चालते फिरते 5 स्टार हॉटेल म्हणता येईल. सर्व प्रकारच्या सुविधा या रेल्वेत असणार आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी एअर हॉस्टेस असणार आहेत. या रेल्वेचा वेग 130 किमी. प्रतीतास असणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापासून ही रेल्वे ट्रॅकवर धावणार आहे.

कोणत्या मार्गावर धावणार

भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी नवनवीन सुविधा देत आहेत. वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन देशात चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. आता लांब पल्यासाठी लग्झरी ट्रेन स्लीपर वंदे भारतही ट्रॅकवर उतरणार आहे. या ट्रेनसाठी 100 दिवसांचा प्लॅन तयार करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत ही ट्रेन धावणार आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेन राजधानी ट्रेन सुरु असणाऱ्या ट्रॅकवर चालवली जाणार आहे.

राजधानीसारख्या तीन श्रेणी

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये 16 कोच असणार आहे. तसेच या ट्रेनमध्ये राजधानीप्रमाणे थर्ड एसी, सेकेंड एसी आणि फर्स्‍ट एसी कोच असणार आहे. बर्थ, एअर डक्ट, केबल डक्ट, वॉशरूमचे डिझाईन राजधानी ट्रेनपेक्षा वेगळे असणार आहे. ही ट्रेन 160 किमी. प्रती तास वेगाने धावू शकते.

अशा असतील सुविधा

वंदे भारतमध्ये ट्रेनमध्ये ज्याप्रमाणे चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये फरक आहे, तसा फरक या लग्झरी ट्रेनमध्ये असणार आहे. या ट्रेनमध्ये थर्ड आणि सेकंड एसीच्या तुलनेत फर्स्ट एसीमध्ये प्रवाशांना अधिक सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यात बर्थ आणि कुशन असतील. या श्रेणीतील प्रवाश्यांना विमानसेवेसारख्या सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय इतर श्रेणींच्या तुलनेत यातील खाणपाण वेगळे असणार आहे. तसेच या डब्यांमध्ये अटेंडंटची संख्याही अधिक असणार आहे. एकंदरीत पुढील काही वर्षांत भारतीय रेल्वे पूर्ण कात टाकणार आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना