AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर इच्छाधारी सापाचा शोध लागला? विचित्र साप पाहून वैज्ञानिकही चकित; कुठं सापडला?

सध्या सर्वांनाच चकित करून टाकणारा एक साप आढळला आहे. या सापाकडे पाहून वैज्ञानिकही चकित झाले आहेत. विशेष म्हणजे सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारा हा इच्छाधारी साप आहे, असादेखील दावा केला जातोय. याच नव्या सापाविषयी माहिती जाणून घेऊ या..

अखेर इच्छाधारी सापाचा शोध लागला? विचित्र साप पाहून वैज्ञानिकही चकित; कुठं सापडला?
snake new speciesImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 11, 2026 | 7:08 PM
Share

New Snake Species : साप म्हटलं की प्रत्येकालाच भीती वाटते. काही साप खूप विषारी असतात. परंतु काही सापांनी दंश केला तरीही काहीही होत नाही. जगभरात सापाच्या हजारो प्रजाती आहेत. वैज्ञानिक दृष्टीकोनातून साप हा पर्यावरणाचा, अन्नसाखळीचा खूप महत्त्वाचा घटक आहे. परंतु याच सापाच्या बाबतीत भारतात तसेच जगभरात अनेक अंधश्रद्धादेखील आहेत. दरम्यान, सापाच्या आणखी एका प्रजाताची शोध लागला असून त्याची वेगळी रचना, त्याचे शरीरा आणि गुणधर्म पाहून तो इच्छादारी साप असल्याचा दावा केला जातोय. सोशल मीडियावर तशी चर्चा रंगली आहे. म्हणूनच हा साप नेमका कसा आहे? त्याची विशेषता काय आहे? यासह सोशल मीडियावर केला जाणारा दावा किती खरा आहे? ते जाणून घेऊ या…

आढळला नवा साप, वैज्ञानिकही चकित

वैज्ञानिकांनी शोधलेल्या या सापाचे नाव अयेयारवॅडी पीट वायपर असे ठेवण्यात आले आहे. म्यानमारमधील अयेयारवॅडी या सर्वात महत्त्वाच्या नदीवरून या सापाच्या नव्या प्रजातीचे नाव ठेवण्यात आले आहे. हा साप पाहून वैज्ञानिकांनादेखील अनेक प्रश्न पडलेले आहेत. कारण काही गोष्टींच्या बाबतीत तो एका प्रजातीतील साप असावा, असे दिसते. तर अन्य विशेषतांचा विचार केल्यास तो साप दुसऱ्याच प्रजातीचा असावा वाटते. म्हणूनच हा साप नेमका कसा आहे? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.

या सापाची विशेषता काय?

दोन वेगवेगळ्या प्रजातींच्या सापांच्या मिलनातून सापांची ही नवी प्रजाती तयार झाली असावी, असा दावा केला जात आहे. हा साप ज्या भागात सापडला त्या भागात सापांच्या अन्य दोन पीट वायपर जाती आढळतात. यातील एका सापाच्या प्रजातीचे नाव रेडटेल पिट वायपर असे आहे. हा साप हिरव्या रंगाचा असतो. त्याच्या अंगावर अन्य कोणतेही निशाण नसते. दुसऱ्या प्रजातीचे नाव मॅनग्रोव्ह पिट वायपर असे आहे. या प्रजातीच्या सापाच्या शरीरावर मोठे डाग असतात. आता नव्याने शोधण्यात आलेल्या सापाच्या अंगावर असे दोन्ही लक्षणं दिसत आहेत. म्हणूनच हा साप इच्छाधारी साप आहे का? असे सोशल मीडियावर विचारले जात आहे. दरम्यान हा काही इच्छाधारी साप नाही, असे सांगण्यात आले आहे. उलट जनुकीय पातळीवर चाचण्या केल्यावर या नव्या प्रजातीबाबत अधिक माहिती समजणार आहे.

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?