AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snake : ही वनस्पती म्हणजे सापांचा काळच, साप पुन्हा घराकडे फिरकणार सुद्धा नाही, आदिवासी लोक आवर्जून लावतात

साप हे नाव जरी नुसतं ऐकलं की लगेच आपल्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. साप आपल्या घरात येऊ नये, यासाठी लोकं वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात. आजही ग्रामीण भागातील लोकं अशा काही वनस्पती आपल्या घरात लावतात, त्यामुळे साप घरापासून दूर राहतो.

Snake : ही वनस्पती म्हणजे सापांचा काळच, साप पुन्हा घराकडे फिरकणार सुद्धा नाही, आदिवासी लोक आवर्जून लावतात
snakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 11, 2026 | 7:56 PM
Share

भारतामध्ये हजारो प्रजातीचे साप आढळून येतात. परंतु त्यापैकी केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच सापांच्या प्रजाती या विषारी आहेत, त्यामध्ये मण्यार, फुरसे, घोणस आणि नाग ज्याला आपण इंडियन कोब्रा असं देखील म्हणतो या चार प्रमुख प्रजातींचा समावेश होतो. मात्र भारतामध्ये सापांबद्दल एक सर्वात मोठा गैरसमज हा आहे की, आपल्याला दिसणारा प्रत्येक साप हा विषारीच असतो, त्यामुळे आपन दिसला साप की त्याला लगेच मारतो. परंतु तसं न करता समजा तुम्हाला तुमच्या घराच्या परिसरात किंवा कुठेही साप आढळला तर त्याला न मारता त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते सापांना पकडून सुरक्षित जागी सोडतील, तसेच तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला पकडण्याचा देखील प्रयत्न करू नका, कारण तसं करणं हे तुमच्या जीवावर बेतू शकतं. कुठलाही साप हा विषारी आहे आणि कुठला साप विषारी नाही याची माहिती आपल्याला नसते, त्यामुळे अशा पद्धतीने साप पकडणं देखील धोक्याचं आहे.

दरम्यान साप आपल्या घरात येऊ नयेत विशेष: पावसाळ्याच्या काळात हा धोका जास्त वाढतो, त्यामुळे आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं असतं. सापाला नेहमी आर्द्रता युक्त दमट आणि जिथे अंधार आहे, अशी जागा आवडते त्यामुळे आपल्या घरात अशी कोणतीही जागा राहणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच जर तुमच्या घरा शेजारी बाग असेल किंवा मोकळी जागा असेल तर अशा ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसात गवत मोठ्या प्रमाणात वाढतं, त्यामुळे सापांना लपण्यासाठी जागा सापडते, त्यामुळे तुमच्या घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. घराच्या परिसरात कोणतीही अडचण असू नये.

काही विशिष्ट वनस्पती अशा असतात ज्यामुळे साप घरापासून दूर राहतो. या वनस्पतींची नैसर्गिक रचनाच अशी असते की ज्या परिसरात या वनस्पती आहेत, त्या परिसरात शक्यतो साप आढळून येत नाहीत. सापांपासून बचावासाठी आजही ग्रामीण भागातील लोक या वनस्पती आवर्जून लावतात. त्यातीलच एक वनस्पती आहे, ती म्हणजे भुईरिंगणी ही एक अशी वनस्पती आहे. या वनस्पतीला असलेल्या विशिष्ट वासांमुळे तसेच कांट्यामुळे जर ही वनस्पती एखाद्या घरात असेल तर त्या घरापासून दूर राहतो.आजही अनेक शेतकरी सापांपासून बचावासाठी ही वनस्पती आपल्या घरात लावतात.

Follow Us
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?