Ajit Doval: तर या कारणांमुळे इंटरनेट वापरत नाहीत भारतीय जेम्स बॉन्ड! मग कुटुंबाच्या कसे राहतात संपर्कात
Ajit Doval not using Internet: भारताचे जेम्स बॉन्ड म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे इंटरनेटचा वापर करत नाहीत. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची ही रणनीती असली तरी त्यामागील कारणं वाचून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. मग ते कुटुंबाशी, मित्रांशी, सहकाऱ्यांशी कसा संवाद साधतात.

Ajit Doval not using Internet: भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांना सुपर स्पाय अथवा भारताचे जेम्स बॉन्ड म्हटल्या जाते. दशकापर्यंत ते गुप्तहेर जगातातील एक अजब रसायन म्हणून ओळखल्या जातात. आता समाज माध्यमांवर एक व्हिडिओ समोर आला आहे. भारतीय वृत्तसंस्था ANI ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडिओत सांगितले की मोबाईल फोन आणि इंटरनेटचा ते कधीही वापर करत नाहीत. या डिजिटल युगात प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोन आणि इंटरनेटशिवाय राहु शकत नाही. तिथे देशातील एका उच्च पदस्थ व्यक्ती विना स्मार्टफोन आणि इंटरनेटशिवाय कसा राहू शकतो हे अनेकांसाठी आश्चर्य आहे. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.
काय आहे त्या व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओत अजित डोवाल हे इंटरनेट का वापरत नाहीत, याची माहिती देताना दिसतात. आपण इंटरनेटचा वापर करत नाही. मोबाईल फोन पण जवळ बाळगत नसल्याचे ते म्हणाले. तुम्हाला ही माहिती कुठून कळली ते मला माहिती नाही, पण मी खरंच इंटरनेटचा वापर करत नाही. फोनचा पण वापर करत नाही. पण खास माहितीसाठी आणि कुटुंब, मित्र यांच्याशी संवाद साधण्यासाठी फोनचा वापर करावा लागतो. पण ते प्रमाण कमी आहे. आपण डिजिटल जगतापासून दूर असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
का नाही वापरत फोन-इंटरनेट?
Ajit Doval फोन अथवा इंटरनेटचा वापर करत नाही हा दिखावा नाही. तर एक विचारपूर्वक कृती आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराकडे दहशतवाद, गुप्त चाल, खास धोरण, निर्णय, आंतरराष्ट्रीय कुटनीतीसंबंधीची अत्यंत संवेदनशील माहिती असते. आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हॅक होऊ शकतो. लोकेशन ट्रॅक होऊ शकतं. त्यामुळे कोणतीही जोखीम नको म्हणून या साधनांचा ते वापर करत नाहीत.
तो अनुभव गाठीशी
अजित डोवाल यांचे संपूर्ण आयुष्य हे गुप्तहेर संघटना IB शी जोडलेले आहे. त्यांनी पाकिस्तानमध्ये गुप्तहेर म्हणून काम केलेलं आहे. शत्रू अगोदर डिजिटलरित्या तुमचा पाठलाग करतो हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे आपला कोणी माग काढू नये आणि आपण कुठे आहोत हे कळू नये यासाठी डोभाल हे फोन आणि इंटरनेटचा वापर करत नाहीत.
View this post on Instagram
मग कसा करतात संपर्क?
ते प्रत्यक्ष भेटीगाठी घेतात
सरकारच्या खास सुरक्षित आणि एन्क्रिप्टेड साधनांचा वापर करतात
ट्रस्टेड मॅसेंजर, फिजिकल कुरिअरचा वापर
ऑफलाईन संगणक, खास प्रकराचे डिव्हाईसचा वापर
मोबाईलचा वापर जरी केला तरी त्याचा पुरावा ते ठेवत नसल्याची माहिती
डिजिटल पुरावा ठेवत नाहीत
