AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonia Gandhi Health Update : सोनिया गांधींची प्रकृती कशी? मध्यरात्री काय घडलं? तब्येतीबद्दलची मोठी अपडेट समोर

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी रुग्णालयात उपस्थित असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

Sonia Gandhi Health Update : सोनिया गांधींची प्रकृती कशी? मध्यरात्री काय घडलं? तब्येतीबद्दलची मोठी अपडेट समोर
Sonia Gandhi
| Updated on: Mar 25, 2026 | 7:35 AM
Share

काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी या ७९ वर्षाच्या असून त्यांना अस्वस्थता जाणवू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला. दिल्लीतील प्रसिद्ध सर गंगा राम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

सध्या प्रकृती कशी?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोनिया गांधी यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. काल रात्री १२ नंतर सोनिया गांधी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना छातीत त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर डॉ. अनुप बसू यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समजताच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा हे तातडीने रुग्णालयात पोहोचले. प्रियंका गांधी सध्या आपल्या आईसोबत रुग्णालयातच उपस्थित आहेत. त्या सध्या रुग्णालयातच असून डॉक्टरांकडून वेळोवेळी प्रकृतीचा आढावा घेत आहेत.

आरोग्याच्या तक्रारींचे सत्र

सोनिया गांधी यांना गेल्या काही महिन्यांपासून वारंवार आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. जानेवारी २०२६ म्हणजेच दोन महिन्यांपूर्वीच त्यांना छातीत संसर्ग आणि ब्रॉन्किअल अस्थमामुळे सहा दिवस रुग्णालयात राहावे लागले होते. थंडी आणि वाढते प्रदूषण यामुळे त्यांचा दमा बळावला होता. त्यापूर्वी जून २०२५ मध्ये पोटाच्या विकारांमुळे त्यांना चार दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते प्रार्थना करत आहेत. अद्याप त्यांच्या प्रकृतीबद्दल रुग्णालयाकडून अधिकृत हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आलेले नाही. लवकरच हेल्थ बुलेटिन जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान सोनिया गांधी यांचा राजकीय प्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. १९६८ मध्ये राजीव गांधी यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी दीर्घकाळ राजकारणापासून अंतर राखले होते. मात्र, १९९१ मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पक्षाच्या आग्रहाखातर १९९८ मध्ये त्यांनी काँग्रेसची धुरा हाती घेतली. २००४ आणि २००९ मध्ये काँग्रेसला विजय मिळवून दिल्यानंतरही त्यांनी पंतप्रधानपद नाकारून डॉ. मनमोहन सिंग यांची निवड केली होती. त्यांच्या या निर्णयाने भारतीय राजकारणात त्यागाचे प्रतीक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. सध्या त्या राज्यसभा खासदार म्हणून कार्यरत आहेत.

Follow Us
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार