AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसचे स्वातंत्र्यसैनिक मार खात होते, तेव्हा सावरकर… सोनिया गांधीच्या पुस्तकात काय लिहिलंय सावरकरांबद्दल?

सोनिया गांधींच्या 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील उल्लेखांमुळे राजकीय वाद पेटला आहे. काँग्रेसचे स्वातंत्र्यसैनिक मार खात असताना सावरकर इंग्रजांना दयेचे अर्ज लिहीत होते, असे पुस्तकात म्हटले आहे. शिंदे गटाने याला 'सावरकरांचा अपमान' म्हणत तीव्र निषेध नोंदवला असून, पुस्तक फाडून आपला संताप व्यक्त केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे.

काँग्रेसचे स्वातंत्र्यसैनिक मार खात होते, तेव्हा सावरकर... सोनिया गांधीच्या पुस्तकात काय लिहिलंय सावरकरांबद्दल?
sonia gandhiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2026 | 2:13 PM
Share

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांच्या ‘बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा दावा शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी केला आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी केवळ दावाच केला नाही तर या पुस्तकाचा निषेध नोंदवून पुस्तक फाडलंही आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने शिंदे गट आणि काँग्रेस आमनेसामने उभे ठाकले आहेत. तर, या निमित्ताने पुन्हा एकदा ‘बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव्ह’ हे पुस्तक चर्चेत आलं आहे. या पुस्तकात सावरकर यांच्याबद्दल नेमकं काय लिहिलंय?

सोनिया गांधी यांनी स्वातंत्र्य वीर सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्व या मुद्द्यांवर पुस्तकातून आपलं मत मांडलं आहे. जेव्हा काँग्रेसचे स्वातंत्र्यसैनिक ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या हातून मार खात होते आणि तुरुंगवास भोगत होते, तेव्हा आरएसएसचे ज्येष्ठ विचारवंत जसे की, विनायक दामोदर सावरकर हे त्यांच्या वसाहतवादी मालकांना दयेचे अर्ज लिहीत होते आणि त्यांचे सदस्य ब्रिटिश अधिकाऱ्यांशी खबऱ्या म्हणून हातमिळवणी करत होते, असं या पुस्तकात सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

त्यांना हिंदूच सर्वोच्च…

स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुत्वाच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विचारधारेचे संस्थापक होते. हिंदूंचे सर्वोच्च स्थान असेल अशा राष्ट्राच्या रुपात ते भारताला पाहत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि त्यांच्या सहयोगी संघटनांकडून ज्या विचारधारेचं समर्थन केलं जातं, त्याला संघ परिवार म्हटलं जातं. भुतकाळातील एका आदर्शवादी समाजाच्या कल्पनेला मानणाऱ्या एका रुढीवादी विचारधारेला ते मानतात. ही विचारधारा अनेक शतकांपासून सुरू असलेल्या पितृसत्ताक आणि वर्णव्यवस्थेचं समर्थन करते. ही विचारधारा सत्ता आणि संपतीच्या केंद्रीकरणाचं समर्थन करते, असं या पुस्तकात म्हटलं आहे.

मोदी सरकारवर टीका

या पुस्तकात मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. खासकरून मोदींच्या शपथविधी सोहळ्यावर टीका करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून पहिला शपथविधी सोहळा पार पडला. हा विशाल सोहळा पाहूनच मला हे सरकार कोणत्या दिशेने जाणार आहे, याचा अंदाज आला होता. हा दिखाऊ सोहळा होता. जगभरात उजव्या विचारधारेच्या सरकारांचा उदय झाला. भारतही त्याला अपवाद नव्हते, असंही या पुस्तकात म्हटलं आहे.

शिंदे गटाचा आक्षेप काय?

या पुस्तकात वीर सावरकर यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांचं विश्लेषण चुकीच्या पद्धतीने करण्यात आलं असून त्यांचा अनादर करण्यात आला आहे, असा दावा शिंदे गटाने केला आहे. सावरकरांचा अपमान झाल्याचं सांगत शिंदे गटाने पुस्तक फाडून निषेध नोंदवला आहे.

Follow Us
बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... सुषमा अंधारे संपापल्या
Sushma Andhare : बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... शायना एनसी यांच्यावर सुषमा अंधारे संतापल्या
शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला.....
Shivsena : सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडताना शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला
शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली....
Sonia Gandhi's Book : Shivsena : सावरकरांचा अपमान सहन करणार नाही...; शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे आक्रमक; हेक्टरी 1 लाखांच्या
Supriya Sule : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे आक्रमक; हेक्टरी 1 लाखांच्या मदतीची मागणी!
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस विकसित
राहुल गांधींचा अमेरिका दौरा चर्चेत; कोलंबिया विद्यापीठातील भाषणातून...
राहुल गांधींचा अमेरिका दौरा चर्चेत; कोलंबिया विद्यापीठातील भाषणातून दिले महत्त्वाचे संकेत!
प्रदिप पूर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर; कुटुंबियांचा लढा कायम, आता...
Pradip Purnekar Case : प्रदिप पूर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर; पुर्णेकर कुटुंबियांचा लढा कायम, आता थेट...
राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांची जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार;
NCP : राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांची जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार; म्हणाले, जेव्हा स्वतःच्याच पक्षाकडून फसवणूक...
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाचे काम थांबवले; अदानी एनर्जीचे अधिकारी...
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाचे काम थांबवले; अदानी एनर्जीचे अधिकारी मंत्रालयात...
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; कोण कोण आहे रिंगणात?
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; कोण कोण आहे रिंगणात?