Ranya Rao Gold Smuggling Case : टॉयलेटमध्येच अर्धी मोहीम फत्ते व्हायची, रान्या रावच्या सोने तस्करीची एक एक गोष्ट समोर

दक्षिणेतील अभिनेत्री रान्या राव हिला दुबईहून सोने तस्करी करण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) केलेल्या तपासात रान्याने सोन्याच्या लडी तिच्या शरीरावर बांधून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. तिला अज्ञात व्यक्तीने फोन करून ही तस्करी करण्यास सांगितले होते.

Ranya Rao Gold Smuggling Case : टॉयलेटमध्येच अर्धी मोहीम फत्ते व्हायची, रान्या रावच्या सोने तस्करीची एक एक गोष्ट समोर
Ranya Rao
Image Credit source: tv9 hindi
| Updated on: Mar 14, 2025 | 7:22 PM

दक्षिणेतील अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिला सोन्याची तस्करी (Gold Smuggling) करण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत संचालनालयाला अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. दुबईच्या वॉशरूममध्ये सोन्याची खेप आपल्या शरीराला बांधली होती. कैचीने एका टेपला कापून एक सोन्याची लड आपल्या शरीराला बांधल्याचं रान्याने सांगितलं. सोन्याच्या तस्करीत अटक करण्यात आलेल्या रान्या रावने सांगितले की, तिला दोन पॉकेटमध्ये सोने देण्यात आले होते. प्लास्टिक सारख्या पदार्थात हे सोने लपेटलेले होते, अशी माहितीही रान्याने डीआरआयला दिलीय. कुणी फोन केला? रान्या रावने डीआरआयला दिलेल्या कबुलीबाबतची माहिती एका न्यूज चॅनलने दिली आहे. या न्यूज चॅनलच्या वृत्तानुसार, रान्याने 1 मार्च 2025 रोजी एका अज्ञात नंबरवरून तिला आलेल्या फोनचा उल्लेख केला आहे. रान्याने तिला अज्ञात नंबरवरून फोन आला होता असं सांगितलं. पण फोन करणारा कोण होता हे तिलाच माहीत...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा