AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kashmir G-20 meet : अतिरेक्यांची काय हिम्मत? क्षणात खाक होतील, भारताचे एलिट कमांडोस मार्कोस तैनात

Kashmir G-20 meet : फुकटची बडबड करणाऱ्या पाकिस्तानला भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने स्पेशल फोर्सेसचे कमांडो तैनात केलेत, याच वैशिष्ट्य म्हणजे ते क्षणार्धात शत्रुला नेस्तनाबूत करतात.

Kashmir G-20 meet : अतिरेक्यांची काय हिम्मत? क्षणात खाक होतील, भारताचे एलिट कमांडोस मार्कोस तैनात
Marcos Commando
| Updated on: May 22, 2023 | 11:41 AM
Share

श्रीनगर : आजपासून श्रीनगरमध्ये G-20 ची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत G-20 देशांचे जवळपास 60 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. 160 पाहुणे सहभागी होतील. दोन दिवस पर्यटन कार्य समूहाची बैठक चालणार आहे. त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी 3 वाजल्यापासून बैठक सुरु होईल. बैठकीसाठी श्रीनगर सजवण्यात आलं आहे.

दल सरोवरापासून अन्य स्थळांना नवीन रुप देण्यात आलय. जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर पहिली मोठी आंतरराष्ट्रीय बैठक श्रीनगरमध्ये होत आहे. श्रीनगरमधील चौक सुंदर-सुंदर पेटिंग्सनी सजवण्यात आले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत पर्यटनाच्या मुद्यावर चर्चा होईल. वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी पर्यटनाशी संबंधित आपल्या कल्पना शेयर करतील.

बैठकीसाठी थ्री टियर सुरक्षा

काश्मीर हे सुरुवातीपासून पर्यटनाच मुख्य केंद्र आहे. त्या दृष्टीने ही बैठक महत्वाची आहे. G-20 च्या या बैठकीवर दहशतवादी हल्ल्याच सावट आहे. दहशतवादी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब करण्यासाठी G-20 च्या बैठकीला लक्ष्य करु शकतात. त्यामुळे या बैठकीसाठी थ्री टियर सुरक्षा व्यवस्था आहे.

स्पेशल फोर्सेसचे कमांडो

श्रीनगरमध्ये दल सरोवरापासून सर्वत्र कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बैठकीला दहशतवाद्यांपासून असलेला धोका लक्षात घेऊन ही तैनाती करण्यात आलीय. श्रीनगरमध्ये स्पेशल फोर्सेसचे मार्कोस कमांडो तैनात करण्यात आले आहेत.

कोण आहेत मार्कोस कमांडो?

दल सरोवरात मार्कोस कमांडो तैनात करण्यात आले आहेत. मार्कोस हे भारतीय नौदलाचे स्पेशल मरीन कमांडो आहेत. अत्यंत वाईटातील वाईट परिस्थिती हाताळण्यात हे कमांडो निष्णांत असतात. अगदी क्षणार्धात शत्रुच्या योजना धुळीस मिळवण्याची त्यांची क्षमता आहे. भारताच पाकिस्तानला सडेतोड उत्तर

G-20 चे सदस्य देश चीन आणि टर्की या बैठकीत सहभागी होणार नाहीत. चीनने बैठकीच्या जागेला विवादीत क्षेत्र म्हटलय. पाकिस्तानने श्रीनगरमध्ये होणाऱ्या बैठकीला विरोध केलाय. भारत सरकारने पलटवार करताना जोरदार प्रत्युत्तर दिलय. G 20 बैठक कुठेही आयोजित करण्यासाठी आम्ही स्वतंत्र आहोत, असं भारताने पाकिस्तानला उत्तर दिलं.

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.