AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चिन्नास्वामी’ बाहेर तुफान गर्दी; पोलिसांचा लाठीचार्ज अन् चेंगराचेंगरी, आरसीबीच्या विजयी रॅलीत नेमकं काय घडलं?

मोठी बातमी समोर येत आहे, आरसीबीच्या विजयी रॅलीमध्ये चंगराचेंगरीची घटना घडली आहे, या दुर्दैवी घटेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

'चिन्नास्वामी' बाहेर तुफान गर्दी; पोलिसांचा लाठीचार्ज अन् चेंगराचेंगरी, आरसीबीच्या विजयी रॅलीत नेमकं काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 04, 2025 | 6:45 PM
Share

आरसीबीच्या संघानं तब्बल 18 वर्षांनी आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे, मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाबचा पराभव केला. दरम्यान त्यानंतर आज निघालेल्या आरसीबीच्या विजयी रॅलीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. आरसीबीच्या विजयी रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली, या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30 जण जखमी झाले आहेत.  मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं? 

तब्बल 18 वर्षांनी आरसीबीनं आयपीएलचं विजेतेपद मिळवलं . सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा लाडका खेळाडू विराट कोहोली यांचं स्वप्न 18 वर्षांनी साकार झालं. हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी आरसीबीच्या फॅननं चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठी गर्दी केली होती. याचवेळी ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30 जण जखमी झाले आहेत, दरम्यान मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आरसीबीनं तब्बल 18 वर्षांनंतर आयपीएलचं विजेतेपद मिळवलं आहे, हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी आरसीबीच्या फॅननं चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठी गर्दी केली होती. समोर आलेल्या माहितीनुसार तब्बल 5 लाखांपेक्षा अधिक लोकं हा सोहळा अनुभवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. तर या स्टेडियमची आसन क्षमता अवघी 32 हजार इतकी आहे.  स्टेडिअममध्ये जागा नव्हती, तरीही काहीजण आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते. गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, यानंतर चाहत्यांची पळापळ झाली, लाठीचार्जमुळे चेंगराचेंगरी झाली, त्यात दहा जणांचा मृत्यू झाला. दरम्यान जेव्हा ही घटना घडली त्यावेळी आरसीबीची टीम स्टेडियममध्ये उपस्थित नव्हती. ज्यावेळी चेंगराचेंगरी झाली, त्यावेळी आरसीबीच्या टीमचा विधानभवन परिसरात सत्कार सुरू होता.

इथे आलेल्या प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र स्टेडियमचं दार बंद असल्यामुळे प्रेक्षकांची धावपळ उडाली, यातच पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर इथे चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण श्वास न घेता आल्यानं बेशुद्ध पडले आहेत. दरम्यान मृताचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?