‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’बाबत 15 रंजक गोष्टी!

'स्टॅच्यू ऑफ युनिटी'बाबत 15 रंजक गोष्टी!

गांधीनगर : भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सन्मानार्थ ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’  गुजरातच्या नर्मदा नदीवरील सरदार सरोवराच्या बंधाऱ्यावर उभा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 31 ऑक्टोबरला सरदार पटेलांच्या जयंतीदिनी जगातील सर्वोच्च पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. अमेरिकेतील  स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट आणि जगातील सर्वात उंच असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं लोकार्पण झालं. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’बाबत 15 रंजक गोष्टी-  

1) ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’साठी सुमारे 1 लाख 69 हजार गावातील शेतकऱ्यांनी 135 मेट्रिक टन लोखंड दान केलं आहे. त्याचा वापर करुन भव्य पुतळा उभारण्यात आला. स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची 182 मीटर इतकी आहे.

2) ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पूर्वी चीनमधील 128 मीटर उंचीची स्प्रिंग टेंपल येथील बुद्धाची प्रतिमा सर्वाधिक उंच होती.

3) चीनमधील स्प्रिंग टेंपल येथील बुद्धाची प्रतिमा तयार करण्यासाठी तब्बल 11 वर्ष लागली होती. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यासाठी केवळ 33 महिन्यांचा कालावधी लागला आहे.

4) 6.5 रेक्टर स्केलचा भूकंपातही स्टॅच्यू ऑफ युनिटी न डगमगता उभी राहू शकते. ताशी 180 किलोमीटरपर्यंत वाऱ्यांचा वेग झेलू शकते.

6) 1999मध्ये पद्मश्री पुरस्कार विजेते राम सुतार यांनी या प्रतिमेचे डिझाईन तयार केले आहे. त्यांनी 50हून अधिक स्मारकांची निर्मिती केली आहे. राम सुतार हे मूळचे महाराष्ट्रातील धुळ्याचे आहेत.

7) मराठमोळे मूर्तीकार राम सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी कित्येक डिझाईन तयार केले होते.

8) नर्मदा नदीपासून 3.5 किलोमीटर दूर असलेल्या सरदार सरोवरावर  स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यात आलं आहे.

9) पर्यटकांना स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या 153 मीटर उंचीपर्यंत जाता येणार आहे.

10) स्टॅच्यू ऑफ युनिटी 12 किमी लांबीवरुन नजरेस पडते.

11) एकाच वेळी 200 पर्यटक प्रतिमेच्या पायथ्याशी असलेल्या संग्रालयात जाऊ शकतात.

12) स्टॅच्यू ऑफ युनिटी तयार करण्यासाठी जवळपास 3 हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

13) स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये 18 हजार 500 टन स्टीलचा वापर करुन भव्य प्रतिमा तयार करण्यात आली आहे. 1 लाख 80 हजार टन सिमेंटचा वापर करण्यात आला आहे.

14) स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये दोन लिफ्ट आहेत, ज्याद्वारे सरदार पटेलांच्या छातीपर्यंत पोहोचता येतं. तिथे गॅलरी आहे, तिथून सरदार सरोवराचं विहंगम दृश्य पाहता येतं. सरदार सरोवरापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना पूल आणि बोटीची व्यवस्था केली जाणार आहे.

15) उन, वारा, पाऊस, भूकंप अशा संकटांना हा पुतळा सहज तोंड देऊ शकतो. 180 किमी प्रति तास वेगाने वाहणारे वारे, 6.5 तीव्रतेचा भूकंप जरी आला, तरी या पुतळ्याला काहीही होणार नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI