AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टार्गेट पूर्ण करण्यासाठी कायपण; दारू पाजून तरुणाची नसबंदी, आरोग्य खात्याचा प्रताप, आता लग्न ही तुटले

Sterilization of an unmarried youth : नसबंदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरोग्य खात्यातील कर्मचार्‍यांनी मोठा प्रताप केला. एका अविवाहित तरुणाला दारू पाजली आणि नंतर त्याची नसबंदी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

टार्गेट पूर्ण करण्यासाठी कायपण; दारू पाजून तरुणाची नसबंदी, आरोग्य खात्याचा प्रताप, आता लग्न ही तुटले
नसबंदी कांड
| Updated on: Dec 08, 2024 | 4:14 PM
Share

पोस्टर बॉईज या चित्रपटाने नसबंदी अभियानातील हलका-फुलका विनोद समोर आणला होता. पण नसबंदीच्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. नसबंदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरोग्य खात्यातील कर्मचार्‍यांनी मोठा प्रताप केला. एका अविवाहित तरुणाला दारू पाजली आणि नंतर त्याची नसबंदी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारुची नशा उलटल्यानंतरही तरुणाच्या हा प्रकार लक्षात आला नाही. पण काही तरी झाल्याच्या शंकेने तो डॉक्टरकडे गेला, तेव्हा नसबंदीचे ऑपरेशन केल्याचे ऐकून धक्काच बसला.

गुजरातमध्ये घडली घटना

गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यात ही घटना समोर आली आहे. नवी शेढवी या गावातील 30 वर्षीय तरुण गोविंद दंतानी याने ही आपबित्ती सांगीतली. तो अविवाहित आहे. शेतात काम करताना त्याच्याकडे एक आरोग्य कर्मचारी आला. त्याने त्याला लिंबू आणि पेरू तोडण्यासाठी रोजंदारीवर बोलावले. 500 रुपये रोज देण्याचे आमिष दाखवले. गोविंद त्यासाठी राजी झाला.

आरोग्य कर्मचाऱ्याने त्याला लागलीच कारमध्ये बसवले. प्रवासा दरम्यान त्याला 100 रुपयांची दारू पाजली. गोविंद नशेत असताना त्याला सरकारी रुग्णवाहिकेतून गांधीनगर जवळ असलेल्या अदलज येथील रुग्णालयात नेण्यात आलं. गोविंद बेशुद्ध असताना त्याच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आली. शुद्धीवर आल्यावर आरोग्य कर्मचार्‍यानेच त्याला पुन्हा शेतात सोडले. गोविंदवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे त्याच्या दुसर्‍या दिवशी लक्षात आले. माजी सरपंच प्रल्हाद ठाकूर यांनी पण या घटनेला दुजोरा दिला.

वेदना झाल्याने प्रकार आला समोर

गोविंदला आरोग्य कर्मचार्‍याने प्रवासात दारू पाजली. त्यानंतर त्याने त्याला जोरागन या गावी नेले. तिथे सुद्धा त्याला दारु पाजण्यात आली. लिंबू आणि पेरू तोडण्यासाठी उद्या जाऊ, अशी बतावणी करण्यात आली. त्याला पुन्हा दारू पाजण्यात आली. त्यानंतर गोविंद हा बेशुद्ध झाला. त्याची नसबंदी करण्यात आली. घरी परतल्यावर पोटात वेदना झाल्याने तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी त्याला तपासले. तेव्हा त्याचे नसबंदीचे ऑपेरशन झाल्याची माहिती समोर आली.

लग्न ही तुटले

या गावातील आरोग्य कर्मचारी जहीर सोलंकी याचे नसबंदीचे टार्गेट पूर्ण झाले होते. पण धनाली या गावातील शहजाद अजमेरी याचे एका ऑपरेशनचे लक्ष्य पूर्ण व्हायचे होते. त्यामुळे जहीर याने ही नसबंदी केल्याची माहिती समोर येत आहे. तर ज्याची नसबंदी करण्यात आली. त्याचे लग्न ठरलेले होते. पण ही बातमी पसरताच वधू पक्षाने नाते तोडल्याची माहिती समोर येत आहे.

आरोग्य खात्याने फेटाळला आरोप

गुजरातमध्ये 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत कुटुंब नियोजन पंधरवाडा साजरा झाला. मेहसाना जिल्ह्याला 175 नसबंदीचे टार्गेट देण्यात आले होते. या ठिकाणी 28 जणांची नसबंदी करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर टार्गेट पूर्ण करण्यासाठीच आरोग्य कर्मचार्‍यांनी हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी हा आरोप फेटाळला आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.