रजनीकांत, कमल हसन यांना जे जमलं नाही ते सुपरस्टार विजयने करून दाखवलं, थलपती कसा बनला लोकनेता?

सुपरस्टार रजनीकांत, कमल हसन यांना जे जमलं नाही ते सुपरस्टार विजयने करून दाखवलं... थलपती विजय यांचा राजकीय प्रवास... थलपती कसा बनला लोकनेता?

रजनीकांत, कमल हसन यांना जे जमलं नाही ते सुपरस्टार विजयने करून दाखवलं, थलपती कसा बनला लोकनेता?
| Updated on: May 04, 2026 | 12:24 PM

अभिनेते थलपती विजय यांच्या प्रवेशाने तमिळनाडूच्या राजकारणात नवीन खळबळ माजली आहे. तमिळनाडूच्या राजकारणात जे अभिनेते रजनीकांत, कमाल हसन यांना करता आलं नाही ते, विजय यांनी करुन दाखवलं आहे. सांगायचं झालं तर, 2024 मध्ये विजय यांनी अभिनय विश्वातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. पण आता सर्वांच्या नजरा विजय यांच्या निकालाकडे येऊन थांबल्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विजय यांनी जाहीरनाम्यात जी आश्वासनं दिली होती, त्यांचा निवडणुकीत मोठा प्रभाव पडल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामध्ये लाडकी बहीण योजन महत्त्वाची ठरत आहे… राजकारणातील अभिनेत्यांच्या व्यक्तिमत्वाची सर्वात लक्षणीय उदाहरणं तामिळनाडूनं पाहिली आहेत. एम.जी.आर. आणि जयललिता या दोन अत्यंत लोकप्रिय अभिनेत्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. पण ते युग आता केव्हाच संपले आहे.

जवळपास 35 वर्षांनंतर अभिनेता विजय यांनी राजकारणात दमदार प्रवेश केला आहे. रजनीकांत, कमल हसन यांना जे जमलं नाही ते सुपरस्टार विजयने करून दाखवलं आहे. दोन वर्षांपूर्वी शून्यातून सुरुवात केलेल्या विजय यांच्यासाठी या निवडणुकीतील कोणताही विजय हा त्यांच्यासाठी आणि त्याच्या पक्षासाठी एक मोठी उपलब्धी असणार आहे. परंतु, हा राजकीय प्रवास सुरू करण्यासाठी विजय यांनी पत्करलेल्या आणि सहन केलेल्या जोखमींचे यश या विजयाच्या व्याप्तीवर अवलंबून असेल.

विजय यांच्या राजकारणातून तमिळनाडू मोठ्या अपेक्षा..

सांगायचं झालं तर, द्रविड चळवळीतून उदयास आलेली तत्त्वांनी तामिळनाडू सरकारच्या धोरणांमध्ये स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली आहे.. सामाजिक न्याय हा धोरणनिर्मितीचा एक भाग आहे. पण आजच्या तामिळ येथील तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. द्रविड राजकारण यशस्वी आहे, पण पुढे काय? दोन पक्षांमध्ये एकाची निवड कधीपर्यंत करणार? ओळखीची लढाई तर जिंकली, पण नोकऱ्या कुठे आहे? राजकारणात उत्तर भारतीय कल्चर नाही, पण तरी देखील भ्रष्टाचार का आहे? जर नीतीमध्ये सोशल जस्टिस दिसत आहे, तर ते जमीनीवर का दिसत नाही.

द्रविड अस्मितेच्या जनआंदोलनातून उदयास आलेले तामिळनाडूतील दोन प्रमुख पक्ष, डीएमके आणि एआयएडीएमके, आता राजकीय वारशाचे पर्याय बनले आहेत. डीएमकेचे नेतृत्व करुणानिधी कुटुंब करतं, तर एआयएडीएमकेवर एमजीआर किंवा जयललिता यांच्याशी निष्ठा बाळगणाऱ्यांची पकड आहे.

याठिकाणी विजय यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नाही… ते द्रविडच्या ओळखीवर धर्म, जात आणि राजकारण करत नाहीत. विजय यांचं लक्ष्य भ्रष्टाचार, तरुणांना मिळणाऱ्या संधी… त्यांचा मेसेद स्पष्ट आहे: द्रविड तत्त्वं आणि भूतकाळातील संघर्षांचा आदर केला जाईल, पण आता आपण भविष्याकडे वाटचाल करूया… अशी देखील विजय यांची भुमिका आहे.

रजनीकांत आणि कमल हासन यांचं अपयशी राजकारणी करियर…

सुपरस्टार रजनीकांत यांनी 2017 मध्ये राजकारणात प्रवेश केला. राजकारणात प्रवेश केल्यानंतर रजनीकांत यांनी आध्यात्म, राष्ट्रवाद आणि इतर गोष्टींवर स्वतःचं मत मांडण्यास सुरुवात केली. तामिळनाडूच्या लोकांना ते आवडलं आहे. त्याठिकाणी लोक राष्ट्रवाद शब्द भाजप आणि काँग्रेसच्या जोडीचा आठवण करुन देतात. जे त्यांच्यासाठी उत्तर भारतीय राजकारणाचे एक वैशिष्ट्य आहे. याच कारणामुळे रजनीकांत यांनी राजकारणातून यू-टर्न घ्यावा लागला…

कलम हसान यांनी 2018 मध्ये राजकारणात प्रवेश केलं. त्यांच्याकडे नवनवीन अनेक आयडिया होत्या. पण सोशल एंकर त्यांच्याकडे नव्हती… शिवाय तळागाळातील राजकारणातही त्याचा कोणत्याच प्रकारचा प्रभाव नव्हता. कमल आणि रजनीकांत दोघेही राजकारणातील आपल्या सुपरस्टार पदाचा फायदा उठवण्यात अधिक रस दाखवत होते. त्यामुळे, त्यांना जनतेकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

विजय यांचा अखेरचा सिनेमा…

तामिळनाडू निवडणुकीच्या आधी विजय यांनी ‘जन नायगर’ सिनेमाची घोषणा केलेली, पण सिनेमा प्रदर्शित झाला नाही. जानेवारीत येणाऱ्या ‘जना नायगन’मुळे, निवडणुकीच्या आधीच्या तीन महिन्यांत विजयच्या राजकीय पदार्पणासाठी एक भक्कम मंच तयार होईल अशी अपेक्षा होती. सांगायचं झालं तर, कोणत्याही नेत्यासाठी लोकांपर्यंत आपला मेसेज, राजकीय रोडपॅक पोहोचवण्यासाठी रॅली सर्वात उपयोगी पर्याय आहे. पण फिल्म स्टारला यासाठी फक्त एक सिनेमा पाहिजे असतो… त्यामुळे तामिळनाडू राजकारणात सिनेमाचं महत्त्व फार गरजेचं आहे…

विजय यांच्या विजयावर सर्वांचं लक्ष…

तामिळनाडू निवडणुकांच्या यशावर फक्त जनतेचं लक्ष नाही तर, इतर राज्यातील विजय यांच्या चाहत्यांचं देखील लक्ष लागलं आहे… सांगायचं झालंतर, यावेळी विजय मुख्यमंत्री होतील की नाही, हे त्यांच्या यावेळच्या कामगिरीवर अवलंबून आहे, जी त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी उपयोगी ठरेल. त्यामुळे, विजय हे 2026 च्या तामिळनाडू निवडणुकीतील सर्वात मोठा चेहरा आहेत, ज्यांच्या राजकीय निकालाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.

Follow Us